Saturday, December 15, 2007

६ : फ़रहान???

परत तोच रस्ता, तीच नेहमीची गाणी; भरदाव वेग आणि एकामागे एक जाणारे नारळीचे माड... वेग अजून वाढवला तरीही तो कधीच रमाला केस बान्धू द्यायचा नाही


जाने जा,
धुन्डता फिर रहा,
मै तुम्हे रात दिन,
फिर कहा
... अगदी जोरजोरात - आवाजाची वाट लागे पर्यन्त बोम्बलत, केवळ त्याला झोप येऊ नये म्हणून बडबड करत त्यानी या अश्या (अ)वेळेला बोरिवलीपासुन गोराईकडे बर्याच वेळा फेर्या केल्या होत्या. त्याला विशेष इन्टरेस्ट असायचा तो पोलिसक्यान्टीन मधल्या शेवटच्या राऊन्ड्च्ये कबाब खण्यात.
रमाने कधी त्याला अडवल नाही. खर म्हणजे त्याला काय कोणालाही 'नाही' म्हणणे रमाला कधीच जमल नव्हत
केवळ गप्पा मारत, गाडीतून फिरत, मस्त चान्दण्या पाहत स्वप्नाळू विषय चघळत एकमेकान्बरोबर कसा, का, किती वेळ गेला आता सान्गता ही येणार नाही... आज त्या सगळ्या आठवणी मात्र रमाला घूसमटवून टाकत होत्या, नको नको झलेल्या, अगदी पार त्रास देत होत्या


"ओये, अशी गप्प का आहेस?" फ़रहान कन्टाळून म्हणाला.
"कुठे काय?" रमाने नजर चुकवून बाहेर पाहील.

पण किर्र रात्री काचेच्या बाहेरच काहीच दिसल नाही तिला. पण तिची गोन्धळलेली अवस्था न्यहाळणारा फ़रहान प्रतिबिम्बात तिला रोखून पहात होता.

नकळत तिने गाडी कडेला पूल केली.

"i had a real long day, why dont you drive please?" -ती

खर तर आता ती खूपच रडवेली झाली होती, पण रडायच नव्हत. फ़रहान तिच्यासाठी जीव ओवाळून टाकायला निघालेला तिला माहीत होत. पण सुरवातीपासून तिने स्वत:भोवती एक कवच नेहमीच ठेवल होत.


दोघही इग्निशन ऑन ठेऊन बसून राहिले.

शान्तता बरी वाटत होती. खूप बोलायच होत, मुख्य म्हन्जे रमाला फ़रहान्चे मनापसून आभार मानायचे होते.

आता मात्र डोळे दाटून आले होते

फ़रहान, घर, नीट नसल तरी एका लयीत चलणार आयुष्य - सगळ तिला मागे टाकायच होत.

फ़रहान नेहमी हाकेच्या अन्तरावर आहे हे (नको असल तरी) पक्क ठाऊक होत.

"जाण्याआधी फ़रहानशी मन मोकळ कस करू" हाच विचार रमा गेले काही दिवस करत होती....

1 comment:

यशोधरा said...

अरे वा!! इंटरेश्टींग!! :D प्रकर्ण आवघड व्हतय का काय????