Sunday, December 23, 2007

तथाकथित

भायलोग -

गोष्टीची कन्सेप्ट सर्किटची - म्हणजे मी काही म्हणणं हे बेसिकली चुकीचंच.
पण तुम्हाला असं नाही वाटत का कि इथे जो काही राडा चाललाय ती म्हणजे शुद्ध च्युतेगिरी आहे?
आय मीन गोष्ट सुरुवातीपासुन वाचुन बघा. कुठलातरी भिकारचोट पिक्चर नाहीतर मालिका बघतोय असं नाही वाटत तुम्हाला? आणि ’तुम्हा’ मध्ये माझाही समावेश होतो.
लोकांना शुद्धलेखनाच्या - तेही स्वत:च्या - चुका दुरुस्त करायची सवड नाही तर असंबद्धपणे शब्दांचे शिंतोडे उडवायला लाज कशी नाही वाटत?
या गोष्टीच्या जाऊद्या - गोष्ट लिहायला ’दम’ लागतो. मी मागचा दीड वर्ष लिहितोय, पण मला अजुनही माझी गोष्ट लिहायची लायकी झालिए असं वाटत नाही. असं पुर्णपणे वाटल्यावरच काही लिहा असं म्हणायचं नाहिए मला - पण अरे जरातरी लॉजिक नको का आपण स्वत: जे लिहितोय त्यामध्ये?
मुर्खपणा तो ही किती?
कुठल्याही मराठी साईट वर जाऊन बघा - पैशाला पाच ब्लॉग्ज आहेत. अशा भाऊगर्दीत तुमच्या नावाला किंमत, आदर असावा असं नाही वाटत तुम्हाला? बाकीच्यांच्या मूल्यांचं जाऊद्यात - स्वत:च्या नावाची तरी काही बूज?

सर्किटने भुमिकेत लिहिल्याप्रमाणे - आधीच्या व्यक्तिने लिहिलेली गोष्ट पुढील व्यक्तिने पुढे न्यावी म्हटलंय. त्याने पात्रांत तुम्हाला गरजेच्या वाटतील अशा सुधारणा करण्यास, नविन पात्रं इनट्रोड्युस करण्यास वाव दिलाय. हे सगळं असताना एकेक पोस्ट पाडणाऱ्या व्यक्तिची लॉजिकली कथा पुढे नेण्याची जबाबदारी तुम्हाला कळतही नाही का?
मुर्खासारखं पोस्ट पब्लिश करायची घाई काय चाललिए तुमची?
रमा, अथर्व, ईषा, फरहान, शमा, रमाचे आई, बाबा, अजिंक्य, शमाची आई, रमाला एअरपोर्टवर भेटलेला एक सहप्रवासी - एवढी पात्रं मला कथेत वाचल्याचं आठवतंय. यातल्या कुठल्या पात्राचं कुठलं व्यक्तिमत्व कुणी स्पष्ट केलंय या गोष्टीत? म्हणजे सगळ्याच व्यक्तिरेखा या आत्तातरी कुचकामी आहेत.
गोष्ट आत्तापर्यंत रमाचं घर, फरहानची गाडी, एअरपोर्ट, शमाचं घर - एवढी फिरल्याचं आठवतंय. यातल्या कुठल्या स्थळाचं लॉजिकल चित्र आपण वाचकांसमोर उभं केलंय?
इथे एकमेकांवर कुरघोड्या करत पोस्ट्सची पिसं उधळणारी पिलावळ सोडुन कुणी ही गोष्ट का वाचावी?
वाचकाचा इंटरेस्ट शाबुत ठेवेल असं या गोष्टीत काय घडलंय?
इथे फीलर्स फीलर्स नावाचा जयघोष मागचे २-४ दिवस ऐकतोय - कुणी सांगितलेत असले नसते धंदे?
लिहा ना तुम्हाला पाहिजे ते - पण ते लिहिताना आपण गोष्ट इथपर्यंत आणणाऱ्या आणि इथुन पुढं नेणाऱ्या कुणाचंतरी काहीतरी देणं लागतो एवढी साधी जाण नको?
आणि गोष्ट इथपर्यंत आणणारे आणि इथुन पुढं नेणारे गेले गा च्या गात - ही गोष्ट वाचणाऱ्या, स्वत:च्या आयुष्यातली सरासरी तीन मिनिटं तुम्हाला देत असलेल्या वाचकांबद्दल - त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल - तुम्हाला काहितरी आदर नको?
का घाई चाललिए स्वत:ला कालच्यापेक्षा आज जास्त मुर्ख सिद्ध करण्याची?
थांबा ना जरा.
विचार करा.
लिहा.
लिहिलेलं परत वाचा.
कथा आपण लॉजिकली, आणि पुढे नेतोय का, सशक्तपणे नेतोय का, संबद्धतेने नेतोय का, वाचकांच्या अटेन्शन स्पॅन बद्दल विचार करुन लिहितोय का याचा विचार करा.
स्वत: लिहिलेल्या पोस्ट्सच्या शुद्धलेखनाच्या चुका स्वत: दुरुस्त करा. जमत नसतील तर त्याबद्दल इतर लोकांची मदत मागा.
आधीच्या लेखकाला त्या त्या पात्राकडुन, त्या त्या घटनेतुन काय अपेक्षित होतं याचा विचार करा.
त्यात काही शंका असतील तर त्यांचं निरसन करुन घ्या.

कुठालाही ब्लॉग वाचनीय किंवा भिकारचोट हे - त्यातल्या प्रत्येक पोस्टच्या पहिल्या तीन वाक्यात कळतं.
त्यानंतर त्यातल्या प्रत्येक पोस्टच्या प्रत्येक पॅरॅग्राफच्या पहिल्या वाक्यात कळतं.
त्यानंतर शेवटच्या वाक्यात भिनतं.
पोस्ट झिंगतं, झिंगवतं.
चांगलं पोस्ट वाचकाला विचार करायला लावतं.
पोस्ट परत परत वाचायला लावतं.
इंटरनेटवर मराठी ब्लॉग्ज वाचणारी जनता - शक्यतो इतर काही मराठी वाचायला मिळत नाही म्हणुन हे वाचतिए. कदाचित थोड्या दिवसांत सवय म्हणुन वाचायला लागेल. ही जनता दिवसभर राबराब राबते, विरंगुळा म्हणुन नेट सर्फ करते. मराठी ब्लॉग्ज नावाचं काहीतरी प्रकरण त्यांनी ऐकलंय, काही लोकांनी त्यातली भाऊगर्दी पाह्यलिए.
एनीवे - अशी जनता चुकुन माकुन ही गोष्ट वाचायला येणार. या लोकांनी ही गोष्ट सुरुवातीपासुन इथपर्यंत का वाचावी?
यात कुठली गोष्ट अशी आली कि वाचक ’क्या बात है!’ म्हणुन गेला?
यातल्या कुठल्या उल्लेखाने त्याच्या विचाराला चालना मिळाली?
यातल्या कुठल्या घटनेमुळे त्याने प्रतिक्रिया लिहायची तसदी घेतली?
याचा विचार करा.
sty1-mar.blogspot.com किंवा ’अघोषित’ या नावांत लक्षात ठेवण्यासारखं काही नाही माहितिए मला. ते लोकांनी लक्षात ठेवावं न ठेवावं याबद्दलची तुमची मतं असतील ती असोत, पण इथं एक चुत्याप्स पोस्ट वाचलं तर पुढच्यावेळेस हे नाव बघुन मेंदु - या नावाची संवेदना माऊसपर्यंत पोचु देत नाही याची कल्पना आहे का तुम्हाला?
थोडक्यात मराठी ब्लॉग्जवर लाज कमवायला वेळ लागतो.
गेलेली लाज सहजासहजी परत येत नाही - याची काहितरी जाणीव आहे का तुम्हाला?
नक्की घाई तरी कसली झालिए तुम्हाला?
माझ्या माहितीप्रमाणे मराठी ब्लॉग्ज लिहिणारे बरेच चांगले लेखक या ब्लॉग चे सभासद आहेत. त्यांना या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा आहे. इथल्या कल्पनादरिद्री मैथुनांमध्ये भाग गेऊन आयुष्य दवडण्याएवढे हरलेले ते नक्कीच नाहीत.
इथलं एकेक पोस्ट वाचुन त्यांना मळमळायला लागलं असेल तर जबाबदार आपण आहोत.

भायलोग -

आत्तापर्यंत हे पोस्ट वाचुन तुम्हाला राग आला असेल तर तो साहजिक आहे.
इनफॅक्ट, राग यावा हाच या पोस्टचा उद्देश आहे.
इथे कुणीही प्रोफेशनल लेखक नाही हे ही मला माहितिए.
पण सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखावी - एवढी साधी गोष्ट सांगायला लागायला नको होती.
तसंच सार्वजनिक उपक्रमात स्वेच्छेने सहभागी झाल्यावर यातुन निर्माण होणारं साध्य ही सर्वात आधी वैयक्तिक जबाबदारी झाली - हे ही.

यातुन देव तुम्हाला सद्‍बुद्धी देवो आणि वाचक तुमची पोस्ट्स वाचोत ही सदिच्छा.

आता (स्पेसिफिकली) खटकलेले मुद्दे -

व्यक्ति:

१) रमा -
ही बाई/मुलगी रात्री दोन वाजता घरी लॅन्डलाईनवर फोन करणाऱ्या फरहान खान नावाच्या व्यक्तिबरोबर फिरायला जाऊ शकते? ते ही आई-बाप घरात असताना? ही एक सुलझी हुई व्यक्ती असेल तर विमानाच्या गेट पाशी आयुष्याचे प्रश्न सोडवत बसु शकते? जेव्हा समस्त जग आपापलं सामान चेक-इन करतं तेव्हा ही बाई - २ चाकाच्या बॅग्ज, हॅवरसॅक इ. घेऊन गेटपर्यंत जाऊ शकते? ही मुलगी फरहानशी लग्नाबद्दल आई-बापाशी बोलायचा विचार करत होती - ती मुदलात फरहानशी या विषयावर बोललेली नाही!!!? हे थोडं म्हणुन ही बाई करियर वगैरे सोडुन समाजसेवा वगैरे विचार करतिए?
’हेरा-फेरी’ मधल्या बाबु भैया चा डायलॉग आठवला - "ये बाबा, तेरा नक्की प्रॉब्लेम क्या है? नौकरी, पैसा कि घर?"

एवढे सगळे झोल असलेली मुलगी - एकतरी झोल कसा निस्तरणार?

२) फरहान -
हा माणुस रमाबरोबर काम करतो - असं सांगण्यात आलं होतं. तो पुढे बेकार कधी आणि कसा झाला?
तो मधुनच शुद्ध कोकणस्थ मराठी आणि मधुनच मराठमोळं मुस्लिम (मला तरी या भाषेला नाव सापडलं नाही) कसं बोलु शकतो?
रमाला (लाळघोटेपणा सोडला तर) हा प्राणी नक्की का आवडतो?
रमाला रात्री दोन वाजता फिरायला घेऊन गेलेला प्राणी त्यानंतर - म्हणजे बहुतेक सकाळी शमाला भेटतो. ती त्याला शॉपिंगला घेऊन चल वगैरे म्हणते. हे दोघं भेटतात कुठे? कारण त्यानंतर (बहुतेक काही काळाने) तो तिला घ्यायला तिच्या घरी जातो, मग तिला घेऊन शॉपिंगला निघालाय तर रमाचा फोन वगैरे - यातली टाईमलाईन मलाच खटकतिए कि आणखी कुणी याचा विचार केलाय?

३) अथर्व ईषा -
ही पात्रं आली आणि त्यांनी रमाला गोष्टीतलं पात्र बनवलं. आणि पुढे रमाने त्यांना कल्पनेतली पात्रं बनवलं. हा झोल कमी म्हणुन ईषा रमासमोर एअरपोर्टवर कशी टपकते? आणि अथर्व ईषा गाडीत वगैरे बसताहेत - म्हणजे ते खरे आहेत कि भास?
कि वाचकाला चुत्यात काढणारे विदुषक?

४) शमा, रमाचे आई, बाबा (आणि त्यांच्या आठ्या), अजिंक्य, शमाची आई, रमाला एअरपोर्टवर भेटलेला एक सहप्रवासी - यांच्या बद्दल मला उत्तरं सोडा, प्रश्न पडण्याइतपतही काही कळलेलं नाही.

स्थळं:

१) रमाचं घर -
याबद्दल रमा फिरायला बाहेर पडल्यानंतर काही कळत नाही.

२) फरहाची एस.यु.व्ही. -
आता याचा कथेशी सुतरामही संबंध नाही - फक्त जनरल नॉलेज म्हणुन - ही गाडी केवढ्याला मिळते?
रमा, गाडी, फरहान - अशी काहितरी तिकडम ऐकल्याचं आठवतंय - यावर कुणी प्रकाश टाकु शकेल काय?

३) एअरपोर्ट -
ये बौत झोल का मामला लग रैला हे बाप....
रमा तिकिट वगैरे कॅन्सल करते कि काय?
मग रिफंड कंपनीला मिळणार? आयला कंपनी वरुन आठवलं - रमाला बॉस वगैरे असेल ना? मग ती त्याला फोन बिन करुन सांगणार का कि - मैने ना, तेरेकु चुत्या बनाया - मै वो काम करने जिधर जा रै थी ना, उधर गईच नई!

सर्किट -

रात्री १ ते पहाटे ४ पर्यंत जागुन एवढं लिहिलंय.
असली पोस्ट्स मी वाचत नाही. इथली वाचतोय, आणि हे पोस्ट लिहितोय कारण मी स्वच्छेने उपक्रमात सहभागी झालोय. मी यात काय करु शकतो ते सांग - मी जमेल तेवढं नक्कीच करीन.
माणुसघाणा मी होतोच, आणि या पोस्टवर मला मिळायच्या तेवढ्या शिव्या मिळोत.
मी आत्तापर्यंत ऍटलिस्ट तुझं आणि ट्युलिपचं लेखन वाचलंय. मी कसा लिहितो याचा मला अंधुकसा अंदाज आहे. ही आणि आणखी डोकी एकत्र येऊन ईमानदारीत प्रयत्न केला तर नक्कीच चांगलं काही बाहेर पडु शकतं याचा मला अजुनही विश्वास वाटतो म्हणुन ही तसदी.

- अभिजित बाठे.

Saturday, December 22, 2007

१५: वाट चालते मी....

"शमा, मेरी बात सुन यार...."

नाही, नाही... शमाला कळल होत, फरहान काय सांगणार आहे....

"सुन शमा, मैं तुम्हें शॉपिंग कॉंप्लेक्स के पास रस्तेमें छोड देता हूँ, तू शॉपिंग कर अन घरी जा टॅक्सी करून..." काही न बोलता शमाने परत एकदा सीडीप्लेअर सुरु केला, सूर गाडीतल्या वातावरणाला वेढून राहिले...

कैसा हे सफर वफाकी मंजिल का
ना है कोई हल दिलोंकी मुश्किल का
धड़कन धडकन बिखरी रंजिशे....


"मी पण येते ना फरहान, रमाने दोघांनाही बोलावलय ना? तुम्हें अकेले आने के लिये तो नहीं कहाँ ना? मैं भी आऊंगी... बस्स!!"

"शमा, समझनेकी कोशीश तो कर!! रमाने काय घोळ घातलाय तिथे, मला काही कळलेल नाही!! आता तिथे मी पोचणार, मग काय ते कळणार... कितना टाईम लगेगा, क्या पता... तुला कंटाळा येइल, तुझ शॉपिंग राहून जाईल... इकडे तुला वेळेत घरी नाही सोडल तर परत तिथून वैताग, समझती क्यों नही यार!!" फरहान वैतागला होता!! ही रमा पण ना.... कधी काही धड बोलत नाही! मनात आल की चालली करायला, कधी काही माझ्याशी शेअर करावस वाटत नाही का हिला आधी? कैसी लडकी हैं.... दिलों दिमागसे हटती भी नहीं....

कहीं तो हर लम्हा, होटोपें फरयाद हैं
किसीकी दुनिया चाहत में बरबाद हैं.....

शमाला शॉपिंग कॉंप्लेक्स्पाशी सोडून फरहानने जितक्या वेगात गाडी मारता येईल, तितक्या वेगात गाडी एअरपोर्टच्या दिशेने मारली! शमाच बाय ऐकायलाही तो थांबला नव्हता......

****

रमा शांतपणे एअरपोर्टवर फरहानची वाट बघत थांबली होती। तिला एकदम मोकळ मोकळ वाटायला लागल होत! काही तरी गुंता सुटल्यासारख! उत्तर सापडल होत, पण अजून धूसर चित्र होत डोक्यात. छोट्या छोट्या डिटेल्स सकट सगळी योजना अजून तयार नव्हती, पण जमेल ना? एकदा कामाला लागल की अंदाज येतच जाईल... तिलाच आश्चर्य वाटत होत, इतके दिवस कधी काही अस सुचलच नाही कस आपल्याला? आपण आपल एकच चाकोरीतल आयुष्य जगत राहिलो, त्याचीच नशा चढत राहिली? ईशा आणि अथर्वच प्लॅनिंग तर नव्हत ते तसल आयुष्य म्हणजे?? फटकवायलाच हव दोघांना!!हा विचार मनात येताच रमा खुदकन हसली!

आजूबाजूला गर्दी, गोंगाट, बजबजपुरी असली तरी आता रमाला शांत वाटत होत, आणि एक कसलातरी अदर्म्य उत्साह वेढायला लागला होता... डोक्यात चक्र सुरु झाली होती...

फ़िटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश....

****

पुढच्या काही मिनिटांत रमापुढे फरहान उभा होता! "तू ठीक तो हैं? क्या हुवा? फ़्लाईट कैसे मिस हो गयी? वृद्धाश्रमाच काय म्हणत होतीस? घरी माहित आहे का?? अरे कुछ तो बोल....!!" फरहानची अस्वस्थता लपत नव्हती...

रमा फरहानकडे बघून समजूतदार हसली. हा एक दोस्त असा आहे की मी कधीही हाक मारेन आणि हा दुसर्‍या क्षणाला हा हजर असेल, बिनाशर्त.... "फरहान, निघूयात की आपण. गाडीत सांगते तुला सगळ. शमा नाही आली?"

"शमा को मार गोली यार, तू चल, आधी सांग मल हे सगळ काय डोक्यात घेतलयस ते... सुन, कुछ खायेगी?"

रमा गाडीत बसली अन तिने काही सांगायला सुरुवात करायच्या आधी फरहानने विचारल, "किधर जाना हैं अब?..."

Thursday, December 20, 2007

१४: रंग दे बसंती

“Excuse me. Are you boarding on Flight no SQ 423? Hello … hello …? Are you …”
“अ … काय? होय … काय झालं?”

“This is the last boarding call for ... … …”

रमाला कोणीतरी जागं केलं. आजूबाजूला काय होतय, किंवा काय होत होतं काहीही कळायच्या आधी तो बोर्डींग कॉल कानात घुमत होता. शेजारचा माणूस – ज्याच्यावर मागाशी ही डाफरली तोच हिला जागा करत होता.

~~ अंजानसा है ये जहा … धुआ धुआ … कदम कदमपर … ~~

कानातला iPod त्या बोर्डींग कॉलला खुन्नस देत त्याहून मोठ्या अवाजात गात होता. रमा अजुनही भानावर येत नव्हती.

“I am sorry, I thought, it’s your flight. मुझे लगा की आप ऊसीके डीटेल्स चेक कर रहे थे कुछ देर पेहले.”

त्या माणसाचा हलणारा चेहरा सोडला तर आणखी काही रमाच्या डोक्यात गेले नाही. पण काहीतरी ऊशीर झालाय एवढे नक्की कळाले. कानातला iPod काढला. मगाशी ऊठवणारा शेजारीपण ऊगाचच ’झोपमोड केली बाईंची’ अशा अविर्भावात केविलवाणा चेहरा करून बाजूला झाला. काही लोकाना देवाघरच वरदान असतं – कोणीही त्यांच्यावर भरवसा ठेवतात. हा गडी काही करूच शकणार नाही असे जणू काही त्यांच्या चेहऱ्यावर लिहिलेले असावे. रमालाही हे कळायला फारसा वेळ लागला नाही.

“Would you please look after my luggage for a while?”

पटकन फ्रेश व्हावे म्हणून तिची पावले रेस्टरूम कडे वळाली. शोधक नजर आजूबाजूला फिरत होती. अथर्व … ईषा … मॅट्रीक्स … मटेरिअलीस्टीक वर्ल्ड … जग जिंकायचय … मदर तेरेसा … गेल … एक एक क्षण … ऊडून चाललेला … अस्तित्व … खरं की खोटं. तीव्र ईच्छा करूनही यामधली कूठलीही पात्रं रमाला आजूबाजूला दिसेनात.

चेहऱ्यावर कितीही पाणी मारले तरी समोरच्या आरशात एकच ती आकृती दिसत होती – आज तीही नवखी वाटत होती. जे काही घडलं … ते घडलं. थोड्या वेळातच ते खरं खोटं हा शोध लावायचा प्रयत्न रमाने बंद केला. एव्हाना सकाळचे ८ – ९ वाजलेले. जितक्या मंद पावलानी ती सामान ठेवून ऊठली तितक्याच वेगात आता पवलं माघारी वळली. त्या गलक्यामधेपण एक वेगळीच स्तब्धता रमाला जाणवली.

“Madam, I am sorry, but I think, they are announcing your name only. Are you Rama by any chance? One security guard was looking for Rama Gokhale here.”

झर झर समान एकत्र बांधत रमा तशीच निघाली. दोन चाकाच्या बॅगा – एक मोठी … एक छोटी, पाठीवर हॅवर सॅक. एक लॅपटॉपची बॅग. खांद्यावर पर्स. जॅकेटच्या खिशामधे तिकीट आणि पासपोर्ट काढून ठेवलेला. हे सगळं सावरताना वेळ लागणारच. त्या शेजाऱ्याला ’धन्यवाद’ म्हणून रमा निघाली.


-------------------------------------------------------------------------------

“अम्मी, शमा घर मे है?”

“अरे वो कबसे तैय्यार बैठी है … और बोलो बेटा, शमा केह रही थी तुम्हारे आब्बाजान ने नयी गाडी ली?”

“नही अम्मी, ऊनके दोस्त की है. वो देशमुख अंकल है ना? ऊनकी …”

“देशमुख … वो … जो नुक्कडपे राहतो?”

“तोच तोच आम्मी … ईतका चेहरा वकडा नको … हसके भी बोल सकते हो!”

“अब तू मुझे मत सिखा …! तू ईत्तासा था ना तबसे …”
शमा नेहमीसारखी एकदम फरहान खींडीमधे सापडल्या सापडल्या आली.

“अम्मी … ऊसे पता है के ऊसका सब कुछ बचपनसे आपहीच किया … चलो हम लोग जाते है”

“ओये मूई … जाते नही … ’जाके आते है’ बोलते है!”

“अम्मी … चिल …! अलोच जाऊन”

शमाला या अशा अल्लड मूडमधे पाहून फरहानला ऊगाच अपराधी वाटलं. या हिच्या सगळ्या खुशीचा विचार न करता काल किती उर्मटपणे धुडकावून लावत होतो याचीही लाज वाटली. पण हे काही नविन नव्हते. फारसे काही करणेही फरहानच्या हातात नव्हते. पुढे एक मोठीच्या मोठी खरेदी वाट बघत होती. हे गाडी घेऊन खरेदी करणे शमाला ऊगाचच एक्साईटींग वाटत होते. ईकडे फरहानला पार्कींग कुठे करायचे याची काळजी खात होती. त्यात ट्राफीक की जसे काही आजच सगळ्या गावाला खरेदी करायची आहे. बाजूला शमाची अखंड टकळी सुरू.

“फरहान … मुझे बताया नही गाडी देशमुख अंकलकी है?”

“कोण म्हणाले त्यांची आहे. ते मी असेच म्हणालो … नाहीतर अम्मी परत शुरू करेगी … ऊनके जमानेमे एक गाडी लेना ऐसा था आणि वैसा था … त्यांच्या डोक्याला कशाला ऊगाच त्रास … म्हणून”

“बास ह … त्रास म्हणे! जसे काही खरच काळजी आहे तुला!?”

बऱ्याच लोकना एक छान लकब असते – गोष्टी अगदी अलगदपणे हसण्यावारी नेण्याची. समोरच्याला थांगपत्ता लागत नाही की खरच मनापासून हसतोय की विषय बदलतोय. आणि आपण नामानिराळे. फरहान त्यापैकी एक होता. शमालापण ते माहीत होते. पण आज या असल्या गोष्टीमधे पडायचेच नव्हते तिला.

~~ “दिल दा मामला है दिलबर …~~

झालं!! वाजला मोबाईल …! शमाला कोणी विचारले असते - मोबाईल – शाप की वरदान? तर यावेळी अगदी छातीठोकपणे “हो हो … मोबाईल शापच!!” असे ओरडून म्हणाली असती. फरहानने फोन बघीतला - दचकला …

“रमा??”
सिग्नलमधून गाडी बाजूला घेण्याचा काहीच मार्ग नव्हता … बाहेरचे ट्रॅफीकपण एकदम तोबा. फरहानने शमाला खुणेनच गाडीमधला सीडीप्लेअर बंद करायला सांगीतला आणि मोबाईलचा लाऊड स्पीकर ऑन केला.

“रमा … तू आहेस?”

“होय. तुझी मदत हवीये … ताबडतोब.”

“अरे ए … तू कुठे आहेस? Everything okay? … … Forget it!! Where are you?? Tell me where are you?”
काहीतरी बिनसलय ईतके शमाला कळाले होते पण याहून जास्त फरहानला पण झेपले नाही.

“फरहान नीट ऐक. आई बाबा कदाचीत पॅनीक होतील, विरोध करतील. त्याना कदाचीत कळणारपण नाही. तुझी साथ हवीये मला…”
रमाच्या या अशा एका एका शब्दागणीक फरहानची धडधड वाढत होती … तिकडे शमाच्या काळजाचा ठोका चुकत होता. ही पोर आता काय बोलून जाते काय माहीत? फरहानच्या पॅनीक प्रश्नांचा जोरही मावळला.

“अगं रमा … तुझी फ्लाईट होती ना … तू कुठून बोलतीयेस?”
या अशा वेळी समोरच्याने आपसूक मुद्दावर यावे जरी वाटले तरी कोणीही स्वतः मुद्द्याला हात घालत नाही. फरहानचीपण तीच गोची सुरू होती. ईकडे शमाला ती गाडी खायला ऊठल्यागत झालेलं. पण रमा काहीतरी वेगळेच बोलत होती.

“मी एअरपोर्टवर आहे. मला घ्यायला येशील? सांगते सगळं”

“मला कमीत कमी २ तास लागतील रमा तिथे पोचायला. येईन मी … पण काय झालेय? तू आहेस ना ठीक?”

“मी ठीक आहे रे वेड्या … कदाचीत आधी नव्हते. आता नक्की आहे. फोन सुरू ठेव … ईथे येईपर्यंत … कोणाशीतरी फार बोलायची ईच्छा आहे.”

“आहे … आहेच सुरू फोन.”

“फरहान … देशमुख अंकल बरोबर आपण एक वृद्धाश्रम पाहीलेला. आठवतय?”

“वृद्धाश्रम??”
मधेच काहीतरी हिब्रूमधे ऐकल्यासारखं शमा दचकली.

“कोण आहे? शमा?”

“हो … शमा बोलतेय … कहा हो रमा?”

“अरे यार तुम्ही लोक मी कुठे आहे या प्रश्नाबाहेर येणार आहात की नाही? मी नीट सांगायचा प्रयत्न करतेय … तर कोणी cooperate करत नाही!! हे बघा … थोडक्यात सांगते … कळतय का बघा … आयुष्याच्या या दोन अपेक्षीत टोकाना आणि ऊपेक्षीत लोकाना भेटवायचय मला - माझे सगळे कसब पणाला लाऊन. आपण दोनहीकडे जाऊन आलोय … मागच्याच आठवड्यात … बरेच अपसेट होऊन तासंतास बसलेलो पण … असं करायचय की परत कधी कोणी त्या ठिकाणी जाऊन अपसेट नाही होणार.

वृद्धाश्रम – जिथे सगळी वडील मंडळी असतात … पण जगण्यावर बोझा असल्यासारखं … But … in other words, it is actually pool of resource – a huge knowledge repository – but un(der)utilized. अनाथ आश्रम … जिथं मोठसं भविष्य एका छोटसं छत्र शोधायचा प्रयत्न करतं – in other words, knowledge seekers. देशमुख अंकलना भेटायचय. मला स्पष्ट दिसतय फरहान – मी आत्तापर्यंत जे काही शिकले वाचले – सगळे या साठीच. कदाचीत वेळ आलीये देवाजीने दिलेल्या या सगळ्या शक्ती वापरायची … … … कुरूक्षेत्रामधे जाण्याचा पक्का विचार केलाय मी. एकटीने पोचायला वेळ लागेल ... तुम्ही लोक असाल बरोबर तर लवकर पोचू ... याल बरोबर?”

शमाचा जीव भांड्य़ात पडला – ऊसने वो नही कहा! पण एक वेगळीच दिशा, वेगळाच विषय दाखवत होती रमा. काहीतरी असंबद्ध किंवा अनपेक्षीत समोर होतं. एअरपोर्टवर जाण्याचा वेळ दिड दोन तासावरून मिनीटावर यावा अशी अतीव इच्छा फरहानला होत होती – काय होतय हे समजून घ्यायचा आटोकाट प्रयत्न सुरू होता त्याचा. रमाला फोनवर प्रश्न विचारून समजून घेता येईल ईतकी सिंपल तर ती कधीच नव्हती.


रमा गोखले – a would-be Assistant Sale Relationship Manager of a big IT company - छत्रपती शिवाजी ईंटरनॅशनल एअरपोर्ट – एका कल्पनेकडे भरारी घ्यायच्या तयारीमधे होती. पुढे बरीच प्रश्नचीन्हं रस्त्यामधे ऊभी होती. पण तिला ऊडायचं होतं – मग या जमीनीवरच्या प्रश्नचिन्हाकडे कोण बघेल? रस्ता दिसत नव्हता पण कुठे पोचायचं माहीत होतं. एक वेगळंच समाधान चेहऱ्यावर होतं

“… … कभी कभी ईन्सान के अंदर की आवाज ऊसे ईतनी दुरतक खीच लाती है की डरकी सारी हदे पार हो जाती है. और वहा होता है एक अजिबसा सुकून. और तब ईन्सान आजाद होता है – वो करने के लिये जो सच है और सही भी. और वही रास्ता सबसे मुष्कील होता है … और सबसे आसानभी …”

Wednesday, December 19, 2007

१३ : एक नवीन वळण

मला वाटायचं मी तुला ओळखते.... हाच आवाज सतत रमाच्या कानात घोळत राहीला.

"म्हन्जे माझ असण, माझे विचार, माझ्या भावना, घरदार- जीव टाकणारे आई-वडील... माझ अस्तित्वच खोट?" ईषाशी बोलून झाल्यावर रमाला पहिल्यान्दा जाणवल की आपण केवळ एक पात्र आहोत.

"समोर काचेमागे विस्तीर्ण मोकळा पसरलेला रनवे मग खरा का खोटा?" काहीच कळेना....

मग खात्री करण्यासाठी रमाने एक कॉफी घ्यायची ठरवली. पण मग विचार केला की कॉफी घ्यायची ईछ्चा झाली म्हन्जे हे नीयतीनेच नाही माझ्या प्रोग्राममधेच लिहिलेल असणार. आपल अस गोन्धळून जाण सूत्रधाराना दिसत असणार, त्याना आता कळलय की . . . . . . . . . . . .

आपल्याला दुसर कोणी आपल्यापेक्षा जास्त ओळखत याची जाणीव रमाला अगदी मरणप्राय वाटली.

नकळत रमा एका लॉबीमधे उभी राहिली. डे-नाईट क्रिकेट match पाहण्यासाठी जो-तो स्क्रीनसमोर येत होता. पण रमाला आज खेळणारे दिसत नव्हते; त्यान्च्या पायाखाली लोळणार्या चार-चार सावल्या दिसत होत्या.

इथे ही असतील का मला पाहणारे ईषा आणि अथर्व???

पहिल्यान्दा रमाला जाणवत होत की ती तिच्या भविष्याची शिल्पकार नाहीच आहे.... मग हे तडफडत अमेरीकेत जायच कशासाठी???

पण नाही... हे कस शक्य आहे??? हे अशक्यच आहे, अगदी अशक्य... मन मानतच नव्हत
"मला वाटायचं मी तुला ओळखते" - परत कानात तिचा गोड आवाज

कधीच 'जी हुजुरी' न केलेल्या या पोरीला, हे सूत्रधार आता मात्र मान्य नव्हते.

का.... ही ईषा आणि हा अथर्व अस्तित्वातच नाहीत?
कारण काल रात्रीच पहिल्यान्दा त्याना पाहिलय आणि आज असे अचानक इथे - एअर्पोर्ट्वर? आणि ते ही टिकीट नसताना ते असे अचानक कसे येतील?

मधेच विचार आला, की security च्या लोकान्शी बोलाव, cameras चेक करावेतपण... पण कोण विश्वास ठेवेल???

कोण बर विश्वास ठेवेल??? - अर्थात फ़रहान,
त्याला मी काय म्हणत्ये ते नक्की कळेल.... पण नक्की कळेल ना?

Afterall I have always lived life on my terms. Independence - the only gauge of human virtue and value - yes - there is no substitute to Independence.... None what so ever

या या क्षणी करीयर, नवीन सुरवात, अपेक्षा, परिणाम या कशाचाही विचार न करता, केवळ स्वत:च आयुश्य स्वत:च्या मर्जीने जगण्याची ऊर्मी प्रकर्षाने उफाळून आली. तात्काळ रमाचे पाय माघारी वळले.

-------------------------------------------------------

"ठर्र - दे आता मला मी मागेन ते?"
"हे बघ - मी तिला जाऊन भेटले म्हणून तर ती थाम्बली. तु कशाला उगाच गमजा मार्तोस?"
"ओये म्याडम वटवट नाही करायची. मी म्हन्टल की रमा थाम्बणार म्हन्जे थाम्बली"
"काय रे, तुला वाटत का रे की रमा खरच स्वतन्त्र होईल?"
"ठर्र "
"अरे ती नाटकातून बाहेर आली तर?"
"चल ग, तुला जागरण जास्त झालय"

-------------------------------------------------------

त्या दोघाना हसत हसत टाळी देत ट्याक्सित बसताना रमाने पाहिल.
"म्हन्जे हे planned होत?"
रमा अजून एअरपोर्टवरच उभी होती.

-------------------------------------------------------

Tuesday, December 18, 2007

११ : फक्त ईषा..

लाउंजमधे सरळ कण्याने, स्थिर नजरेने एकटक समोर पहात बसलेल्या, विस्कटलेल्या विचारांचा चेहर्‍या वर किंचितही मागमूस न दाखवणार्‍या रमाकडे पहाता पहाता ईषा स्वत:शीच चकीत होत हसली.

ऐक..

बघ तिच्याकडे. तिच्या भविष्याकडच्या नजरेकडे. प्रत्येकच पात्र आपल्या लेखणीच्या तालावर नाही नाचत अथर्व.
किती गोंधळात पाडण्याचा प्रयत्न केलास तिला ... ती सापडलीही त्या त्या वेळी तशी गोंधळाच्या सोसाट्यात.
पण ही त्यात अडकून भिरभिरणारी मुलगी नाहीये.

अथर्वकडून काहीच प्रतिसाद आला नाही. त्याचं लक्षच नव्हतं जणू ईषाच्या बोलण्याकडे ह्यावेळी.

अनेक गोष्टी त्याला बरोबर ऐकू येतात. न सांगता, न सवरता.. त्याला ऐकता येतात, समजतात आणि लक्षात सुद्धा रहातात हे तिच्या जसं लक्षात आलेले होते तसेच आवर्जून ऐकाव्यात अशा बर्‍याच गोष्टी त्याला ऐकायलाच येत नाहीत हे ही.

हे त्याला ऐकू येणार नव्हते.

तेव्हां मग तिने स्वत:लाच सांगीतलं.

ऐक..

ही अंधारात रस्ता हरवलेल्या मुलीची गोष्ट नाही. तर सर्वांनी पायदळी तुडवलेला मळलेला रस्ता नाकारुन स्वत:चा मार्ग स्वत:च शोधत निघालेल्या एका मुलीची गोष्ट आहे.

ती जितकी तिची आहे तितकीच माझीही.

अथर्व .. कदाचित ही तुझीही कहाणी असेल, त्या.. पूर्वीच्या तुझी. जी मधेच कधीतरी सुटून गेली आपल्याही हातांतून लिहिली जायच्या आधीच.

तेव्हा तु ऐक...

हे आणि कठीणच. अथर्वला वाटले.

Monday, December 17, 2007

१० : अघोषित

"वास्यमिदं ..."

"ईदं बिदं काही नाही! नाट्य दिसतय ना?"

दिसतय ईषाबाई … आणि रंगतयपण. मजा येतेय … रमा तीही गोखल्यांची … कामावरून येणारे बाबा … हा फरहान … त्याची रातोरात आलेली गाडी … आणि गाडीमधे अडकलेली या दोन जिवांची चलबिचल! आणि मग शमा तिचे प्रेम”

“प्रेमात असतेच मजा ठर्र ... ऐसा लगे की, चुपचाप दोनो, पल पल मे पुरी सदिया बिताये!”

“मजा फरहानची ग … आणि हे ठर्र वगैरे सोड ग … तू काय लहान आहेस काय?”

“वा रे वा मजा काय फरहानची? मजा प्रेमाची … आणि मी लहान नाहीए … ठर्र”

“आहेच ना … ऐश्वर्या आणि माधुरी एकदम प्रेमात पडलेत त्याचा. ठर्र पुराण बंद कर आता … मी विचार करतोय”

“बाबा ऐश्वर्या कुठे प्रेमात पडलीये …? आणि क्युट दिसतोयस विचार करताना … ठर्र”

“नसेल पडली पण तू तिलाही प्रेमात पाडायची पुर्ण फील्डींग लावलीच आहेस … नाही पडली प्रेमात तर नवल … म्हणे प्रेमातली मजा! यात एकजण रडलाच पाहीजे काय? प्रेम आणि गुंता हे समानार्थी शब्द बनवायचा का अट्टाहास?”

“आईने ठरवलेल्या मुलीशीच लग्न करायचं ज्यानी पुर्वीच ठरवलंय आणि उगीच लफडी ज्याना नाही करायची त्याना काय माहीत?”

“तू ऊगाच सेंटी मारू नको … हे बघ … आपण ठरवूया की या कथेमधे काय काय करायचे नाही.”

“करायचे नाही?”

“हो करायचे नाही … म्हणजे रमा परदेशी जाऊन फरहानशी तासंतास चॅट करून करून त्याच्या प्रेमात पडणार … नाही! किंवा ईथे शमा आणि रमा यांची तुलना होणार … नाही. ना फरहानच्या मनात ना आपल्या मनात. तिकडे दामल्यांचा प्रतीक अचानक अमेरीकेत ऊगवणार … नाही किंवा त्याचा शमाबरोबर टाका भीडणार … नाही! गोखले कुटुंब … दामले कुटुंब … खान कुटुंब कोणा कार्यक्रमाला एकमेकांसमोर येणार … नाहीत.”

“अरे अरे … मग होणार काय? रमा तर निघाली अर्धवट अवसान गाडीत सोडून. फरहान थका हारा अगदी एजवर जाऊन पुन्हा परत आला … तिकडे गोखले काकानी दामल्याना फोन केला … ईकडे शमा पण फराहानला परवाना करायच्या बेतात आहे! या सगळ्यांच काय करणार? आता यात आणखी काय होणार?”

“होणार ना … का नाही होणार? प्रेम वगैरे विषय असतातच असे – सगळ्या गोष्टी दुय्यम करून टाकतात. पण पलीकडे बघायची तयारी असेल तर दिसेल असेच नाही दिसायचे. विसरू नको रमा वादळ आहे … तिला साधारण करू नको …”

“अथर्वा … नक्की विचार काय आहे?”

“विचार नेक आहे … रमा अमेरीकेला पोचलीच नाही.”

“काय? असे कसे … तिला तर सगळ्यानी एअरपोर्टवर सी ऑफ वगैरे केले. पळून गेली की काय? फरहान बरोबर?”

“नाही … फ्लाईट डीले झाली. सामान चेक ईन केले … पण मधेच विमानात गडबड झाल्याने ऊडायची वेळ पुढे ढकलली.”

“… ह… ओके … मग? बसेल रमा … वेटींग रूम मधे … स्नॅक्स म्हणून काहीतरी घेईल. त्या १२ का १८ नंबरच्या गेटच्या ईथे फ्री ईंटरनेट कनेक्शन मिळते … तिथे बसून कोणाला तरी मेल पण टाकेल … म्हणेल बोअर होतेय ईथे. अचानक फ्लाईट पुढे ढकललीये … किंवा सरळ फरहानला किंवा घरी फोन करेल”

“बरोबर … असेच काहीतरी … किंवा विचार करत बसेल … गाडीमधे काय झाले त्याचा…”

“काय झाले नाही त्याचा”

“काय झाले असते त्याचा”

“फरहान मधून बाहेर पडत नाहीए ती”

“पडेल … पडेल .. थोड्याच वेळात पडेल … तिला कुठे माहीत आहे पुढे काय होणार आहे …?”

“काय होणार आहे?”

“Excuse me? Are you asking me?”

रमा नकळत शेजाऱ्यावर डाफरलेली … आणि शेजारीपण बावचळून प्रतिकाराचा माफक प्रयत्न केलेला!

“No … I am … I mean … these guys … I think … nothing … फ्लाईटचे काय होणार आहे?”

रमानेही सावरले … माहीत असलेल्या ऊत्तराचाच प्रश्न विचारून वेळ मारून नेली. काहीतरी बिनसलय तिचं याची कल्पना आली … आज नाही बोललो म्हणजे फक्त आजचे मरण ऊद्यावर … हेही तिला माहीत होते. हा आहे तरी कोण? काय स्थान आहे फरहानचे? की आपण काय स्थान बनवलेय त्याचे? असे सगळे प्रश्न अवती भोवती फिरत होते. त्यात आणि मधेच बडबड करणारे हे अथर्व आणि ईषा … जेव्हा जेव्हा येतात तेव्हा तेव्हा अडचणीमधे टाकून जातात!

आजूबाजूच्या लोकांकडे ऊगाच नजर फिरवत वेळ ढकलणे सुरू झाले. प्रत्येकाची वेगळी तऱ्हा. कोणी सहकुटुंब आलेला असेल तर त्याचा सगळं सामन आणि वर पोराला वगैरे सांभाळताना सुरू असलेली कसरत. सगळे काही रमा नव्याने दिसल्यासारखं बघत होती. काहीतरी नविन होते त्यात. पण कळेना.

Sunday, December 16, 2007

८ : तगमग!

गाडीतलं वातावरण नि:शब्द होतं.. दोघांचेही डोळे व्याकूळ होते.. काहीतरी बोलायचं होतं, सांगायचं होतं, पण शब्द हातात सापडत नव्हते.. एक हळवी शांतता पसरली होती..

इतक्यात..

रमाच्या मोबाईलवर सतार झंकारली. खाडकन दोघंही भानावर आले..

घरून फोन होता. गडबडीनेच रमानी फोन घेतला, बाबा होते फोनवर..
"अगं रमा, आहेस कुठे तू? बरी आहेस ना?"

रमाला अपराधीच वाटलं खूप. पहाटेचे चार वाजले होते. मगाशी फरहान आला या आनंदात ती तशीच घराबाहेर पडली होती. एक चिठ्ठीही नव्हती ठेवली. बाबांना चिंता वाटणं सहाजिक होतं..
"हां, हो बाबा, मी ठीक आहे.."

"अगं आहेस कुठे तू? अशी न सांगता सवरता गेलीस कुठे अचानक? हिला जाग आली.. पहाते तर तू घरी नाहीस.. काय समजायचं आम्ही अश्यावेळी?" बाबांच्या मनातल्या चिंतेची जागा आता रागानी घेतली..

"काही नाही बाबा, मी नीट आहे. अशीच फरहानबरोबर लॉंग ड्राईव्हला आलेय.. येतेच मी अर्ध्या तासात.."

फरहान! बाबांच्या कपाळावरची शीरच तडकली. उद्या ही मुलगी परदेशी निघाली आणि अश्या वेळीही हिला घरी रहावसं वाटत नाही? कोण कसला तो फरहान? त्याला ना नोकरी, ना धंदा.. बापाच्या पैश्यावर सगळी ऐट. आणि ही या वेळी त्याच्याबरोबर???

त्यांना इतका राग आला की फोनवर ते काही बोलूच शकले नाहीत. ’लवकर ये’ इतकंच म्हणून त्यांनी फोन कट केला.

रमानी मोठा निश्वास सोडला. फरहानला फोनवरच्या बोलण्याचा अंदाज आला. तोही तसाच गप्प बसून राहिला.

रमाला जाणवलं.. ’ती’ वेळ गेली होती.. ती मंतरलेली वेळ.. कदाचित त्यात बरंच काही घडूनही गेलं असतं.. जे आत्तापर्यंत अव्यक्त होतं, जे मनाच्या एका कप्प्यात दडलेलं होतं.. ते कदाचित बाहेर आलं असतं.. पण!! गेली होती ती वेळ..

फरहाननी रमाकडे पाहिलं. मनकवडा होताच तो आणि रमाच्या मनातलं तर त्याला तिच्याकडे न बघताही कळायचं. कसंबसं ओठाच्या कोपर्‍यात एक छोटं हसू आणून तो म्हणाला,
"चल, घरी जाऊया?"

रमानी खूप कृतज्ञतेनी पाहिलं त्याच्याकडे. फरहान! कसं कळतं तुला सगळं!! आय विल मिस यू सो मच!

ते परत फिरले. परत येताना फरहाननी मुद्दाम कॉलेजमधल्या आठवणी छेडल्या. ते जुने दिवस आठवत आठवत ते घरी कधी पोचले समजलंही नाही. तोवर दोघांचाही मूड हलका झाला होता, मनातली खळबळ थोडीतरी शांत झाली होती.

घर आलं. रमा कारमधून उतरणार इतक्यात अचानक फरहाननी तिचा हात धरला. तिच्या डोळ्यात पाहून तो म्हणाला,
"रमा, टेक केअर. लवकर परत ये.."

’आपण जातोच का आहोत’ असे काहीसे विचार रमाच्या मनात यायच्या आधीच त्याने झटक्यात तिचा हात सोडलाही.. मिष्किलपणे म्हणाला,

"माझ्याकडे बघत बसू नकोस.. जा आता.. बाबा वाट पहातायेत.. मी फोन करीन.. बाय.."
-------------------------------------------------------------------------------

टळटळीत दुपार पसरली होती.. फरहान तळमळत होता.. ’काय सालं नशीब आहे? तो फोन तेव्हाच यायचा होता? श्या! आज कदाचित रमाच्या दिलकी बात आली असती बाहेर.. काय माहौल होता.. पहाटेची वेळ, मोकळा रस्ता, नवी कार आणि रमा! खुदा!! मेरा सपना मेरे कितने पास था.. पण शेवटी हाती काहीच आलं नाही.. श्या!!’

वैतागून त्याने उशी जोरात फेकली..

आणि अचानक बसलेल्या त्या तडाख्यानी शमा जोरात ओरडली..

"ऊयी अम्मा! ये लडका तो.. मेरी जानही लेगा एक दिन.."

तितक्याच आवेशात तिनी ती उशी जोरात फरहानच्या दिशेनी फेकली. पण तो कसला ऐकतोय? त्याने सहज ती पकडली त्याच्या हातात.

शमाला अचानक पाहून त्याला खूप बरं वाटलं.. पण आजकाल तो मुद्दाम तिच्याशी तुटक बोलत होता.. पगली.. तिच्या मनातलं कधीच कळलं होतं त्याला.. आणि तो नव्हता देऊ शकणार तिच्या भावनांना न्याय हेही त्याला माहित होतं. म्हणूनच त्याला नसत्या आशेला तिला लावायचं नव्हतं..

"ए, तू कहाँसे टपकी अभी?"

शमा थोडी खट्टू झाली. पण फारसं मनावर न घेता ती म्हणाली,
"मला तुझा वेळ हवाय.. तुझी अपॉइंटमेन्ट हवीये.. सुनो, ईद आ रही है.. माझ्याबरोबर शॉपिंगला येशील?"

झुरळ झटकावं तसं तो म्हणाला, "ह्यॅ.. मी? आणि शॉपिंगला? आणि तेही तुझ्याबरोबर? क्यों? मैं नही आनेवाला.."

"प्लीज फरहान.. एकदा तरी चल ना माझ्याबरोबर.. नेहेमी असंच करतोस.. मुझे बहुत सारी शॉपिंग करनी है.. और तुम और तुम्हारी नयी कार चाहिये मुझे मेरा सामान उठाने केलिये.." खट्याळपणे हसत ती म्हणाली..

तिचा निरागसपणा पाहून तो विरघळला.."ठीक है, कब?"

शमाचा आनंद गगनात मावेना.."खरं ना? नक्की येशील ना माझ्याबरोबर? ओ थँक्स!! .. कल जायेंगे.. दिनभर.. १० बजे आना घर मुझे लेने.."

नाचत नाचतच ती बाहेर पडली.. खुदाने मेरा सुन लिया.. उद्याचा पूर्ण दिवस फरहान तिच्याबरोबर असणार होता.. उद्या ती सांगणारच होती त्याला सगळं.. कसं, केव्हा, कधी?? माहित नाही, पण सांगणार नक्की..
-----------------------------------------------------------------------------------------

त्या रात्री-

रमा फ्लाईटचे सोपस्कार पूर्ण करून एकदाची बसली विमानात. पण तिच्या मनात बेचैनी होती.. परदेशवार्‍या आधी झाल्या होत्या, पण आज मन उगाचच भरून आल्यासारखं वाटत होतं..

फरहानही बेचैन होता. आज झालेली रमाबरोबरची भेट, आणि उद्या काय घडणार आहे याची चिंता.. प्रयत्न करूनही त्याला झोप येत नव्हती..

शमा मात्र उद्याची वाट पहात गुलाबी स्वप्नात रमली होती..