Monday, December 17, 2007

१० : अघोषित

"वास्यमिदं ..."

"ईदं बिदं काही नाही! नाट्य दिसतय ना?"

दिसतय ईषाबाई … आणि रंगतयपण. मजा येतेय … रमा तीही गोखल्यांची … कामावरून येणारे बाबा … हा फरहान … त्याची रातोरात आलेली गाडी … आणि गाडीमधे अडकलेली या दोन जिवांची चलबिचल! आणि मग शमा तिचे प्रेम”

“प्रेमात असतेच मजा ठर्र ... ऐसा लगे की, चुपचाप दोनो, पल पल मे पुरी सदिया बिताये!”

“मजा फरहानची ग … आणि हे ठर्र वगैरे सोड ग … तू काय लहान आहेस काय?”

“वा रे वा मजा काय फरहानची? मजा प्रेमाची … आणि मी लहान नाहीए … ठर्र”

“आहेच ना … ऐश्वर्या आणि माधुरी एकदम प्रेमात पडलेत त्याचा. ठर्र पुराण बंद कर आता … मी विचार करतोय”

“बाबा ऐश्वर्या कुठे प्रेमात पडलीये …? आणि क्युट दिसतोयस विचार करताना … ठर्र”

“नसेल पडली पण तू तिलाही प्रेमात पाडायची पुर्ण फील्डींग लावलीच आहेस … नाही पडली प्रेमात तर नवल … म्हणे प्रेमातली मजा! यात एकजण रडलाच पाहीजे काय? प्रेम आणि गुंता हे समानार्थी शब्द बनवायचा का अट्टाहास?”

“आईने ठरवलेल्या मुलीशीच लग्न करायचं ज्यानी पुर्वीच ठरवलंय आणि उगीच लफडी ज्याना नाही करायची त्याना काय माहीत?”

“तू ऊगाच सेंटी मारू नको … हे बघ … आपण ठरवूया की या कथेमधे काय काय करायचे नाही.”

“करायचे नाही?”

“हो करायचे नाही … म्हणजे रमा परदेशी जाऊन फरहानशी तासंतास चॅट करून करून त्याच्या प्रेमात पडणार … नाही! किंवा ईथे शमा आणि रमा यांची तुलना होणार … नाही. ना फरहानच्या मनात ना आपल्या मनात. तिकडे दामल्यांचा प्रतीक अचानक अमेरीकेत ऊगवणार … नाही किंवा त्याचा शमाबरोबर टाका भीडणार … नाही! गोखले कुटुंब … दामले कुटुंब … खान कुटुंब कोणा कार्यक्रमाला एकमेकांसमोर येणार … नाहीत.”

“अरे अरे … मग होणार काय? रमा तर निघाली अर्धवट अवसान गाडीत सोडून. फरहान थका हारा अगदी एजवर जाऊन पुन्हा परत आला … तिकडे गोखले काकानी दामल्याना फोन केला … ईकडे शमा पण फराहानला परवाना करायच्या बेतात आहे! या सगळ्यांच काय करणार? आता यात आणखी काय होणार?”

“होणार ना … का नाही होणार? प्रेम वगैरे विषय असतातच असे – सगळ्या गोष्टी दुय्यम करून टाकतात. पण पलीकडे बघायची तयारी असेल तर दिसेल असेच नाही दिसायचे. विसरू नको रमा वादळ आहे … तिला साधारण करू नको …”

“अथर्वा … नक्की विचार काय आहे?”

“विचार नेक आहे … रमा अमेरीकेला पोचलीच नाही.”

“काय? असे कसे … तिला तर सगळ्यानी एअरपोर्टवर सी ऑफ वगैरे केले. पळून गेली की काय? फरहान बरोबर?”

“नाही … फ्लाईट डीले झाली. सामान चेक ईन केले … पण मधेच विमानात गडबड झाल्याने ऊडायची वेळ पुढे ढकलली.”

“… ह… ओके … मग? बसेल रमा … वेटींग रूम मधे … स्नॅक्स म्हणून काहीतरी घेईल. त्या १२ का १८ नंबरच्या गेटच्या ईथे फ्री ईंटरनेट कनेक्शन मिळते … तिथे बसून कोणाला तरी मेल पण टाकेल … म्हणेल बोअर होतेय ईथे. अचानक फ्लाईट पुढे ढकललीये … किंवा सरळ फरहानला किंवा घरी फोन करेल”

“बरोबर … असेच काहीतरी … किंवा विचार करत बसेल … गाडीमधे काय झाले त्याचा…”

“काय झाले नाही त्याचा”

“काय झाले असते त्याचा”

“फरहान मधून बाहेर पडत नाहीए ती”

“पडेल … पडेल .. थोड्याच वेळात पडेल … तिला कुठे माहीत आहे पुढे काय होणार आहे …?”

“काय होणार आहे?”

“Excuse me? Are you asking me?”

रमा नकळत शेजाऱ्यावर डाफरलेली … आणि शेजारीपण बावचळून प्रतिकाराचा माफक प्रयत्न केलेला!

“No … I am … I mean … these guys … I think … nothing … फ्लाईटचे काय होणार आहे?”

रमानेही सावरले … माहीत असलेल्या ऊत्तराचाच प्रश्न विचारून वेळ मारून नेली. काहीतरी बिनसलय तिचं याची कल्पना आली … आज नाही बोललो म्हणजे फक्त आजचे मरण ऊद्यावर … हेही तिला माहीत होते. हा आहे तरी कोण? काय स्थान आहे फरहानचे? की आपण काय स्थान बनवलेय त्याचे? असे सगळे प्रश्न अवती भोवती फिरत होते. त्यात आणि मधेच बडबड करणारे हे अथर्व आणि ईषा … जेव्हा जेव्हा येतात तेव्हा तेव्हा अडचणीमधे टाकून जातात!

आजूबाजूच्या लोकांकडे ऊगाच नजर फिरवत वेळ ढकलणे सुरू झाले. प्रत्येकाची वेगळी तऱ्हा. कोणी सहकुटुंब आलेला असेल तर त्याचा सगळं सामन आणि वर पोराला वगैरे सांभाळताना सुरू असलेली कसरत. सगळे काही रमा नव्याने दिसल्यासारखं बघत होती. काहीतरी नविन होते त्यात. पण कळेना.

5 comments:

ओहित म्हणे said...

जरासा धडसी प्रयत्न केलाय ... कथेमधले बरेचसे धागे आहेत तसेच सोडतोय ... पण ते कुठूनही जोडायची जागाही ठेवतोय ... पण ओळखीच्या वाटेवर जाणारी कथा जराशी नव्या वाटेवर नेण्याचा हा थोडासा प्रयत्न.

अथर्व ... ईषा ... आणि रमा ... कथेमधली ही पात्रं आत्तापर्यंत एकदम जास्ती अपीलींग वाटली - त्यानाच धरून ठेवतोय.

"काहीतरी वेगळं" हा तसा vague शब्द ठेवून पोस्ट आटपलाय ... बाकी कथा रसिक लेखकांच्या हाती परत सुपुर्त.

Tulip said...

just superb Rohit!! sunder blend keli ahes characters ani plot.te kay nakoy te explain kelayas te tar agdi garjech ahe. ani te chhan kel ahes. typical honyapasun vachel nidan ata.

सर्किट said...

jabaradast!

i can't believe it.

atharva ani isha che dialogs, ani post Abhijit Bathe ne lihilela nahiye?

I cudn't believe it, ekada vaTala ki blogspot.com bighaDala tar nahiye na? :)

well posted, Sangram!!

TheKing said...

Next post quickly pls!

सर्किट said...

किंग, तुम्ही लिहा नेक्स्ट पोस्ट.. ही लोकशाही आहे! :)