लाउंजमधे सरळ कण्याने, स्थिर नजरेने एकटक समोर पहात बसलेल्या, विस्कटलेल्या विचारांचा चेहर्या वर किंचितही मागमूस न दाखवणार्या रमाकडे पहाता पहाता ईषा स्वत:शीच चकीत होत हसली.
ऐक..
बघ तिच्याकडे. तिच्या भविष्याकडच्या नजरेकडे. प्रत्येकच पात्र आपल्या लेखणीच्या तालावर नाही नाचत अथर्व.
किती गोंधळात पाडण्याचा प्रयत्न केलास तिला ... ती सापडलीही त्या त्या वेळी तशी गोंधळाच्या सोसाट्यात.
पण ही त्यात अडकून भिरभिरणारी मुलगी नाहीये.
अथर्वकडून काहीच प्रतिसाद आला नाही. त्याचं लक्षच नव्हतं जणू ईषाच्या बोलण्याकडे ह्यावेळी.
अनेक गोष्टी त्याला बरोबर ऐकू येतात. न सांगता, न सवरता.. त्याला ऐकता येतात, समजतात आणि लक्षात सुद्धा रहातात हे तिच्या जसं लक्षात आलेले होते तसेच आवर्जून ऐकाव्यात अशा बर्याच गोष्टी त्याला ऐकायलाच येत नाहीत हे ही.
हे त्याला ऐकू येणार नव्हते.
तेव्हां मग तिने स्वत:लाच सांगीतलं.
ऐक..
ही अंधारात रस्ता हरवलेल्या मुलीची गोष्ट नाही. तर सर्वांनी पायदळी तुडवलेला मळलेला रस्ता नाकारुन स्वत:चा मार्ग स्वत:च शोधत निघालेल्या एका मुलीची गोष्ट आहे.
ती जितकी तिची आहे तितकीच माझीही.
अथर्व .. कदाचित ही तुझीही कहाणी असेल, त्या.. पूर्वीच्या तुझी. जी मधेच कधीतरी सुटून गेली आपल्याही हातांतून लिहिली जायच्या आधीच.
तेव्हा तु ऐक...
हे आणि कठीणच. अथर्वला वाटले.
Tuesday, December 18, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
8 comments:
ये हुई ना बात!....
आता कसं! जाम ऑबव्हियस होत होतं सगळं. जबरा ट्युलिप!
सहीये! तुझ्यातल्या रमाने मान वर करून स्वत:कडे पाहिलंच शेवटी आत्मविश्वासाने! ;)
was waitin' 4 that!
आता रमा पेटलीये, आता बाकीच्या पात्रांचं काय खरं दिसत नाय! :)
बहुतेक ट्युलिपच्या पुढच्या पोस्ट चं नाव ’विमानतळावर तोडफोड’ असेल! :))
तसं मला वाटलेलं की आता पुढे एलीअन्स वगैरेना आणावे एअरपोर्टवर ... किंवा एकदम ईल्युजन मधे न्यावे रमाला ... सगळे ब्रह्मांड फिरवावे आजूबाजूला ... किंवा काहीतरी लर्जर दॅन लाईफ करावे तिने ... काहीही ... अगदी एलीअन्स वगैरे नाही आले तरी ...
Leaving jokes apart ...
त्याआधी सगळी पात्रं अशी एकदम well defined व्हायला पाहीजेत ... किंवा predictable पाहीजेत की कोण कधी काय करेल हे वाचकाला आपसूक कळावे - आणि मग अनपेक्षीत घडवण्यात मजा :-)
कथा predictable झाली तर मजा नाही ... पात्र predictable झाली वाचकाला की मग गाडी घुमवायला मजा.
वेग ... वेग ... वेग पाहीजे कथेला ... आणि ट्युलीपबाईनी गिअरमधे टाकलेली आहे गाडी
जाऊंदे पुढच्या स्टॉपला ...
wow peeps, I am geting to learn so much... thanks
आता पात्र आणि सूत्रधार दोघान्चीही गोष्ट गुम्फत जाणार तर!!!
sahich....wanted to do this...you guys did it already....zakkas!
हॆ सगळ सहि चाललय!! वाचायला खुप मजा येतेय! किप ईट अप!!
Post a Comment