Sunday, December 23, 2007

तथाकथित

भायलोग -

गोष्टीची कन्सेप्ट सर्किटची - म्हणजे मी काही म्हणणं हे बेसिकली चुकीचंच.
पण तुम्हाला असं नाही वाटत का कि इथे जो काही राडा चाललाय ती म्हणजे शुद्ध च्युतेगिरी आहे?
आय मीन गोष्ट सुरुवातीपासुन वाचुन बघा. कुठलातरी भिकारचोट पिक्चर नाहीतर मालिका बघतोय असं नाही वाटत तुम्हाला? आणि ’तुम्हा’ मध्ये माझाही समावेश होतो.
लोकांना शुद्धलेखनाच्या - तेही स्वत:च्या - चुका दुरुस्त करायची सवड नाही तर असंबद्धपणे शब्दांचे शिंतोडे उडवायला लाज कशी नाही वाटत?
या गोष्टीच्या जाऊद्या - गोष्ट लिहायला ’दम’ लागतो. मी मागचा दीड वर्ष लिहितोय, पण मला अजुनही माझी गोष्ट लिहायची लायकी झालिए असं वाटत नाही. असं पुर्णपणे वाटल्यावरच काही लिहा असं म्हणायचं नाहिए मला - पण अरे जरातरी लॉजिक नको का आपण स्वत: जे लिहितोय त्यामध्ये?
मुर्खपणा तो ही किती?
कुठल्याही मराठी साईट वर जाऊन बघा - पैशाला पाच ब्लॉग्ज आहेत. अशा भाऊगर्दीत तुमच्या नावाला किंमत, आदर असावा असं नाही वाटत तुम्हाला? बाकीच्यांच्या मूल्यांचं जाऊद्यात - स्वत:च्या नावाची तरी काही बूज?

सर्किटने भुमिकेत लिहिल्याप्रमाणे - आधीच्या व्यक्तिने लिहिलेली गोष्ट पुढील व्यक्तिने पुढे न्यावी म्हटलंय. त्याने पात्रांत तुम्हाला गरजेच्या वाटतील अशा सुधारणा करण्यास, नविन पात्रं इनट्रोड्युस करण्यास वाव दिलाय. हे सगळं असताना एकेक पोस्ट पाडणाऱ्या व्यक्तिची लॉजिकली कथा पुढे नेण्याची जबाबदारी तुम्हाला कळतही नाही का?
मुर्खासारखं पोस्ट पब्लिश करायची घाई काय चाललिए तुमची?
रमा, अथर्व, ईषा, फरहान, शमा, रमाचे आई, बाबा, अजिंक्य, शमाची आई, रमाला एअरपोर्टवर भेटलेला एक सहप्रवासी - एवढी पात्रं मला कथेत वाचल्याचं आठवतंय. यातल्या कुठल्या पात्राचं कुठलं व्यक्तिमत्व कुणी स्पष्ट केलंय या गोष्टीत? म्हणजे सगळ्याच व्यक्तिरेखा या आत्तातरी कुचकामी आहेत.
गोष्ट आत्तापर्यंत रमाचं घर, फरहानची गाडी, एअरपोर्ट, शमाचं घर - एवढी फिरल्याचं आठवतंय. यातल्या कुठल्या स्थळाचं लॉजिकल चित्र आपण वाचकांसमोर उभं केलंय?
इथे एकमेकांवर कुरघोड्या करत पोस्ट्सची पिसं उधळणारी पिलावळ सोडुन कुणी ही गोष्ट का वाचावी?
वाचकाचा इंटरेस्ट शाबुत ठेवेल असं या गोष्टीत काय घडलंय?
इथे फीलर्स फीलर्स नावाचा जयघोष मागचे २-४ दिवस ऐकतोय - कुणी सांगितलेत असले नसते धंदे?
लिहा ना तुम्हाला पाहिजे ते - पण ते लिहिताना आपण गोष्ट इथपर्यंत आणणाऱ्या आणि इथुन पुढं नेणाऱ्या कुणाचंतरी काहीतरी देणं लागतो एवढी साधी जाण नको?
आणि गोष्ट इथपर्यंत आणणारे आणि इथुन पुढं नेणारे गेले गा च्या गात - ही गोष्ट वाचणाऱ्या, स्वत:च्या आयुष्यातली सरासरी तीन मिनिटं तुम्हाला देत असलेल्या वाचकांबद्दल - त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल - तुम्हाला काहितरी आदर नको?
का घाई चाललिए स्वत:ला कालच्यापेक्षा आज जास्त मुर्ख सिद्ध करण्याची?
थांबा ना जरा.
विचार करा.
लिहा.
लिहिलेलं परत वाचा.
कथा आपण लॉजिकली, आणि पुढे नेतोय का, सशक्तपणे नेतोय का, संबद्धतेने नेतोय का, वाचकांच्या अटेन्शन स्पॅन बद्दल विचार करुन लिहितोय का याचा विचार करा.
स्वत: लिहिलेल्या पोस्ट्सच्या शुद्धलेखनाच्या चुका स्वत: दुरुस्त करा. जमत नसतील तर त्याबद्दल इतर लोकांची मदत मागा.
आधीच्या लेखकाला त्या त्या पात्राकडुन, त्या त्या घटनेतुन काय अपेक्षित होतं याचा विचार करा.
त्यात काही शंका असतील तर त्यांचं निरसन करुन घ्या.

कुठालाही ब्लॉग वाचनीय किंवा भिकारचोट हे - त्यातल्या प्रत्येक पोस्टच्या पहिल्या तीन वाक्यात कळतं.
त्यानंतर त्यातल्या प्रत्येक पोस्टच्या प्रत्येक पॅरॅग्राफच्या पहिल्या वाक्यात कळतं.
त्यानंतर शेवटच्या वाक्यात भिनतं.
पोस्ट झिंगतं, झिंगवतं.
चांगलं पोस्ट वाचकाला विचार करायला लावतं.
पोस्ट परत परत वाचायला लावतं.
इंटरनेटवर मराठी ब्लॉग्ज वाचणारी जनता - शक्यतो इतर काही मराठी वाचायला मिळत नाही म्हणुन हे वाचतिए. कदाचित थोड्या दिवसांत सवय म्हणुन वाचायला लागेल. ही जनता दिवसभर राबराब राबते, विरंगुळा म्हणुन नेट सर्फ करते. मराठी ब्लॉग्ज नावाचं काहीतरी प्रकरण त्यांनी ऐकलंय, काही लोकांनी त्यातली भाऊगर्दी पाह्यलिए.
एनीवे - अशी जनता चुकुन माकुन ही गोष्ट वाचायला येणार. या लोकांनी ही गोष्ट सुरुवातीपासुन इथपर्यंत का वाचावी?
यात कुठली गोष्ट अशी आली कि वाचक ’क्या बात है!’ म्हणुन गेला?
यातल्या कुठल्या उल्लेखाने त्याच्या विचाराला चालना मिळाली?
यातल्या कुठल्या घटनेमुळे त्याने प्रतिक्रिया लिहायची तसदी घेतली?
याचा विचार करा.
sty1-mar.blogspot.com किंवा ’अघोषित’ या नावांत लक्षात ठेवण्यासारखं काही नाही माहितिए मला. ते लोकांनी लक्षात ठेवावं न ठेवावं याबद्दलची तुमची मतं असतील ती असोत, पण इथं एक चुत्याप्स पोस्ट वाचलं तर पुढच्यावेळेस हे नाव बघुन मेंदु - या नावाची संवेदना माऊसपर्यंत पोचु देत नाही याची कल्पना आहे का तुम्हाला?
थोडक्यात मराठी ब्लॉग्जवर लाज कमवायला वेळ लागतो.
गेलेली लाज सहजासहजी परत येत नाही - याची काहितरी जाणीव आहे का तुम्हाला?
नक्की घाई तरी कसली झालिए तुम्हाला?
माझ्या माहितीप्रमाणे मराठी ब्लॉग्ज लिहिणारे बरेच चांगले लेखक या ब्लॉग चे सभासद आहेत. त्यांना या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा आहे. इथल्या कल्पनादरिद्री मैथुनांमध्ये भाग गेऊन आयुष्य दवडण्याएवढे हरलेले ते नक्कीच नाहीत.
इथलं एकेक पोस्ट वाचुन त्यांना मळमळायला लागलं असेल तर जबाबदार आपण आहोत.

भायलोग -

आत्तापर्यंत हे पोस्ट वाचुन तुम्हाला राग आला असेल तर तो साहजिक आहे.
इनफॅक्ट, राग यावा हाच या पोस्टचा उद्देश आहे.
इथे कुणीही प्रोफेशनल लेखक नाही हे ही मला माहितिए.
पण सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखावी - एवढी साधी गोष्ट सांगायला लागायला नको होती.
तसंच सार्वजनिक उपक्रमात स्वेच्छेने सहभागी झाल्यावर यातुन निर्माण होणारं साध्य ही सर्वात आधी वैयक्तिक जबाबदारी झाली - हे ही.

यातुन देव तुम्हाला सद्‍बुद्धी देवो आणि वाचक तुमची पोस्ट्स वाचोत ही सदिच्छा.

आता (स्पेसिफिकली) खटकलेले मुद्दे -

व्यक्ति:

१) रमा -
ही बाई/मुलगी रात्री दोन वाजता घरी लॅन्डलाईनवर फोन करणाऱ्या फरहान खान नावाच्या व्यक्तिबरोबर फिरायला जाऊ शकते? ते ही आई-बाप घरात असताना? ही एक सुलझी हुई व्यक्ती असेल तर विमानाच्या गेट पाशी आयुष्याचे प्रश्न सोडवत बसु शकते? जेव्हा समस्त जग आपापलं सामान चेक-इन करतं तेव्हा ही बाई - २ चाकाच्या बॅग्ज, हॅवरसॅक इ. घेऊन गेटपर्यंत जाऊ शकते? ही मुलगी फरहानशी लग्नाबद्दल आई-बापाशी बोलायचा विचार करत होती - ती मुदलात फरहानशी या विषयावर बोललेली नाही!!!? हे थोडं म्हणुन ही बाई करियर वगैरे सोडुन समाजसेवा वगैरे विचार करतिए?
’हेरा-फेरी’ मधल्या बाबु भैया चा डायलॉग आठवला - "ये बाबा, तेरा नक्की प्रॉब्लेम क्या है? नौकरी, पैसा कि घर?"

एवढे सगळे झोल असलेली मुलगी - एकतरी झोल कसा निस्तरणार?

२) फरहान -
हा माणुस रमाबरोबर काम करतो - असं सांगण्यात आलं होतं. तो पुढे बेकार कधी आणि कसा झाला?
तो मधुनच शुद्ध कोकणस्थ मराठी आणि मधुनच मराठमोळं मुस्लिम (मला तरी या भाषेला नाव सापडलं नाही) कसं बोलु शकतो?
रमाला (लाळघोटेपणा सोडला तर) हा प्राणी नक्की का आवडतो?
रमाला रात्री दोन वाजता फिरायला घेऊन गेलेला प्राणी त्यानंतर - म्हणजे बहुतेक सकाळी शमाला भेटतो. ती त्याला शॉपिंगला घेऊन चल वगैरे म्हणते. हे दोघं भेटतात कुठे? कारण त्यानंतर (बहुतेक काही काळाने) तो तिला घ्यायला तिच्या घरी जातो, मग तिला घेऊन शॉपिंगला निघालाय तर रमाचा फोन वगैरे - यातली टाईमलाईन मलाच खटकतिए कि आणखी कुणी याचा विचार केलाय?

३) अथर्व ईषा -
ही पात्रं आली आणि त्यांनी रमाला गोष्टीतलं पात्र बनवलं. आणि पुढे रमाने त्यांना कल्पनेतली पात्रं बनवलं. हा झोल कमी म्हणुन ईषा रमासमोर एअरपोर्टवर कशी टपकते? आणि अथर्व ईषा गाडीत वगैरे बसताहेत - म्हणजे ते खरे आहेत कि भास?
कि वाचकाला चुत्यात काढणारे विदुषक?

४) शमा, रमाचे आई, बाबा (आणि त्यांच्या आठ्या), अजिंक्य, शमाची आई, रमाला एअरपोर्टवर भेटलेला एक सहप्रवासी - यांच्या बद्दल मला उत्तरं सोडा, प्रश्न पडण्याइतपतही काही कळलेलं नाही.

स्थळं:

१) रमाचं घर -
याबद्दल रमा फिरायला बाहेर पडल्यानंतर काही कळत नाही.

२) फरहाची एस.यु.व्ही. -
आता याचा कथेशी सुतरामही संबंध नाही - फक्त जनरल नॉलेज म्हणुन - ही गाडी केवढ्याला मिळते?
रमा, गाडी, फरहान - अशी काहितरी तिकडम ऐकल्याचं आठवतंय - यावर कुणी प्रकाश टाकु शकेल काय?

३) एअरपोर्ट -
ये बौत झोल का मामला लग रैला हे बाप....
रमा तिकिट वगैरे कॅन्सल करते कि काय?
मग रिफंड कंपनीला मिळणार? आयला कंपनी वरुन आठवलं - रमाला बॉस वगैरे असेल ना? मग ती त्याला फोन बिन करुन सांगणार का कि - मैने ना, तेरेकु चुत्या बनाया - मै वो काम करने जिधर जा रै थी ना, उधर गईच नई!

सर्किट -

रात्री १ ते पहाटे ४ पर्यंत जागुन एवढं लिहिलंय.
असली पोस्ट्स मी वाचत नाही. इथली वाचतोय, आणि हे पोस्ट लिहितोय कारण मी स्वच्छेने उपक्रमात सहभागी झालोय. मी यात काय करु शकतो ते सांग - मी जमेल तेवढं नक्कीच करीन.
माणुसघाणा मी होतोच, आणि या पोस्टवर मला मिळायच्या तेवढ्या शिव्या मिळोत.
मी आत्तापर्यंत ऍटलिस्ट तुझं आणि ट्युलिपचं लेखन वाचलंय. मी कसा लिहितो याचा मला अंधुकसा अंदाज आहे. ही आणि आणखी डोकी एकत्र येऊन ईमानदारीत प्रयत्न केला तर नक्कीच चांगलं काही बाहेर पडु शकतं याचा मला अजुनही विश्वास वाटतो म्हणुन ही तसदी.

- अभिजित बाठे.

20 comments:

सर्किट said...

yeu dya ata jara story la baLasa. :D

bahut ho gaya "beating around the bushes"..

पूनम छत्रे said...

bathe, lavakar lihaa.. tyaa yaadeet majhaM naav naahiye.. mhaNje malaa story pudhe nyayala parawanagi ahe ka? :D

ओहित म्हणे said...

मित्रहो ... कथा पुढे सरकवायची आयडीआ आलीये एक ... पण जर खरच जरा गोची वाटत असेल तर त्या १४व्या पोस्ट वर VOLP घेऊ ... दुसरीकडे वळवू गाडी

Tulip said...

सगळं नाही तरी ह्यातलं 80+% पटलं.

अभिजित : मला वाटतय तु जितक्या गंभीरपणे ह्या STY चा विचार केलास तसा इन्क्लुडिंग मी फारसा केला नाही.
STY म्हणजे सगळ्या जणांनी मिळून कथेची जितकी मस्ती आणि मजा करत वाट लावायची तितकी कमी, थोडं विडंबनात्मक असं त्याचं स्वरुप मोस्टली मायबोलीवरच्या STY मधे ज्यांनी भाग घेतला किंवा ती वाचली त्यांचा असतोच.
सुरुवातीला माझाही होता. पण नंतर मलाही वाटलं कथा वेगळ्या प्रकारे, वेगळ्या वळणाने पुढे नेली जाउ शकते आणि मग ती टिपिकल व्हायला लागली त्याचा त्रास व्हायला लागला. पण एकतर इथे कथेनी वळण गंभीर घेतलं तरी सगळ्यांचाच तसा मूड असेलच असे नाही. आणि STY मधे त्यांना त्यांच्या मूडप्रमाणे कथा पुढे न्यायचा अधिकारही आहेच. तेव्हां त्याची भिकारचोट मालिका किंवा फ़िल्म झालेली कितीही आवडली नसली तरी STY मधे त्याबद्दल आक्षेप घेणे चुकीचेच.
आणि पोस्ट पब्लिश करायच्या घाईबद्दल म्हणशील तर परत STY फ़ॉर्म संबंधात : खरंतर STY मधे इतर वेळी जी घाईगडबड उडते गोष्ट पब्लिश करायची त्यामानाने इथे फारच कासवाच्या गतीने गोष्ट पुढे (?) गेलीय. त्यातच STY ची सगळी मजा सामावलेली असते. धक्के एकामागून एक जितके जोरदार आणि लगेच बसतील तितकी STY रंगते.
इंटरेस्ट शाबूत रहात नाहीय कारण मुळातच कथा गांभिर्याने पुढे न्यायचा केवळ पोरखेळ चाललाय ना त्यात मजा ना गंभिरपणा असं काहीतरी धेडगुजरीपणा आलाय.
STY ह्या फ़ॉर्ममधे जर दोन किंवा तीन जण समविचारांचे सामिल असतील तर कथा एकजिनसीपणे तुला जसं वाटतय तशा गांभिर्याने पुढे जाऊ शकते. अन्यथा नाही.

बाकीच्या तुझ्या मुद्द्यांबद्दल म्हणजे तुला ब्लॉग्ज कशाप्रकारे असावेत असं वाटतय आणि त्याची वाचनीयता तु कशी ठरवतोस ह्याबद्दलचे तुझे विचार प्रचंड मननीय वगैरे आहेत. इथे नो सरकॅजम. मला खरंच असंच म्हणायचय. आणि शुद्धलेखनाच्या चुका कॅरक्टरायझेशन, भाषा, किंवा इतर मुद्दे जे कथा ह्या प्रकारात आवश्यक असूनही दुर्लक्षीले जातात, नेहमीच त्याबद्दल : ते योग्यच आहेत. माझ्याबाबतीत कदाचित सर्वात जास्तं होतं असल्याने ते कितीही नावडलं,टोचलं तरी बिनशर्त मान्य. पुढे मागे मी जर कधी कथा लिहिल्या तर तुझं हे पोस्ट मी गाईडलाईन म्हणून रीफ़र करीन हे नक्की.

तरीही मला वाटतय की हा असा इथला पहिलाच प्रयत्न आहे आणि तुझ्या पोस्टमधील कळकळीच्या तरीही हार्श भाषेने हा STY चा अंकुर मुळापासून उखडला जाऊ नये. There is always a next time for a better try.

सर्किट ने जे VOLP पोस्ट टाकलं होतं ते परत टाकलं तर कदाचित अजूनही उपयोग होऊ शक

सर्किट said...

as tulip said, 80% agreeable post.

VOLP is back.

btw, i was gonna suggest 1 thing.

every writer "owns" 1 character. he/she decides that character's dialogs & thoughts. no one else interferes in that. other person should write dialogs & thoughts of "his/her" character only.

a newly joining author should introduce his/her own new character.

hya mule bicharya ramachi zali tashi farapaT tari honar nahi.

what say?

(i know, tulip will protest, but this can be an experiment of new sty type)

Tulip said...

why would i protest Circuit?
It's a good suggestion.
फक्त मग कथा मोस्टली मोनोलॉग्ज मधून मांडली जाईल आणि तशी गेली तर मग ती 'पुढे' कशी काय जाईल पता नही. शिवाय कोण authors कोणत्या characters बाबत कंफ़र्टेबल आहेत हे कसे ठरवायचे? so ते तु ठरव आणि सांग.
मला असंही वाटतय की अभिजितने सुरुवातीला ईषा आणि अथर्व इंट्रोड्यूस केले तेव्हां ते सगळंच abstract पद्धतीच होतं. त्यांची काय ओळख किंवा कथेतलं त्यांचं स्थान, ते सूत्रधारच असावेत कां ह्याबद्दलच्या त्याच्या कल्पना पुढच्या एखाद्यातरी पोस्टमधून टाकल्या असत्या तर बरंचसं कन्फ़्यूजन टाळलं गेलं असतं. तो अजूनही ते करु शकतो.

Meghana Bhuskute said...

dyrqtlमनापासून धन्यवाद. मला हे लिहायची हिंमत झाली नसती, त्यातलं अक्षर अन्‌ अक्षर खरं असूनही. मी फक्त हळूहळू वाचणं बंद केलं असतं आळशीपणे ’मरू देत’ असं म्हणून. त्याऐवजी आपण काय करायला हवं असा विचार करायला लावणारं लिहिलं आहेस तू.
मनापासून आभार.

Meghana Bhuskute said...

आणखी एक.
मला माहितीय, इथल्या बर्‌याच जणांचं शुद्धलेखन चांगलं आहे. पण तरी बर्‌याच ढोबळ चुका दिसतात हेही खरं आहे.
मला शुद्धलेखनाच्या चुका कशा दुरुस्त करतात ते ठाऊक आहे. मी शुद्धलेखन आणि मुद्रितशोधनाचा रितसर अभ्यास केलाय आणि माझा अभ्यास जेव्हा अपुरा पडेल, तेव्हा रिफर करायला माझ्याकडे योग्य ती पुस्तकं आणि माणसं आहेत. जर तुम्हांला माझी मदत हवी असेल, तर ती द्यायला मला आवडेल. ती कशी करता येईल, याबद्दल कदाचित सर्किट काही सुचवण्या देऊ शकेल...

Abhijit Bathe said...

ट्युलिप -

उगीच पकवु नकोस. मला नाही माहित बाकिच्या साईट्स वर sty वगैरे झोल कसे चालतात ते. ते जाणुन घ्यायची मला गरजही वाटत नाही.
याच्याशी साधर्म्यासारखा मला तरी अंताक्षरी हा एकच प्रकार दिसतो.
आधीच्या गायकाने गायलेल्या गाण्याच्या मूडशी साधर्म्य असणं, गाणं सीरियस किंवा टाईमपास असणं वगैरे वगैरे कुठल्याही गोष्टी अंताक्षरीत अपेक्षित नसतात. एकच गोष्ट बेसिक नियम असते कि नविन गायकाने आधीच्या गायकाचा शेवटचा शब्द पकडुन अस्तित्वात असलेल्या कुठल्याही गाण्याने अंताक्षरी पुढे न्यावी.
तुम्हाला त्या अक्षरावरुन गाणं सुचत नसल्यास गप्प बसावं.
सुचत असल्यास ते म्हणावं.
ते किती इंटरेस्टिंगली म्हणावं ते म्हणणाऱ्याच्या हातात.
म्हणणारा मग ते कितीही फुलवु शकतो, गाण्यात जान आणु शकतो.
हे बेसिक लॉजिकच झालं ना?
एवढ्या साध्या एकमुद्दी नियमानेही धमाल मनोरंजक करणारा कार्यक्रम होऊ शकतो ना?
मग ते इथे लागु नाही?
म्हणजे तु गाणं म्हणायचं आणि मी असंबद्ध पणे आणि निर्बुद्ध कल्पनादरिद्री रितीने बाराखडी म्हणायला लागायचं ही तुझी ’मस्ती’ ची कन्सेप्ट आहे?

करा ना मस्ती, कोण नाय म्हणतंय - आणि मी कुठे म्हटलं कि स्टोरी सिरियस बनवा? स्टोरी बनायची तितकी विनोदी बनवा ना....
पण ती सिरियसली लिहा.
ईमानदारीत लिहा.
वाचकाच्या बुद्धिमत्तेबद्दल जरातरी आदर बाळगुन लिहा - एवढंच म्हणायचंय मला.

तुला वाटतंय कि जगातला कुठलाही माणुस - कितीही पकला असला तरी - ही गोष्ट वाचेल?

आणि नसेल वाचणार तर हा काय इथं लिहिणाऱ्यांचा एकमेकांना गुदगुल्या करण्याचा खेळ आहे कि काय?

Shuchita said...

हे दोस्तानो,

अभिजित म्हणतो ते खर आहे; शाई कागदावर आधी पडली आणि मग एखाद चित्र तयार झाल / तयार केल; अस थोड होताय आपल्या कथेत. मला खर तर १२व्या पोस्ट्पासून परत सुरवात करायला आवडेल.

शुध्द लिखाणाबद्दल कोणाच मन दुखावल असेल तर माफ करा यार, पण माझ्याकडे रेफरन्स काहीही नाही... येप, मी मानल पाहीजे की मी ऑनलाईन ट्राय देखील केला नाहीये.

another suggestion - how about having some of you as moderators? I am really new to blogging; I would love to get guidance and move on

shuchi

Tulip said...

अभिजित अरे ठिक आहे ना आता कळलं आम्हाला तु इरीटेट वगैरे झाला आहेस ते अणि तितकेच आम्हीही झालो होतो हेही लिहून झालंय. तु ते मुद्दाम पोस्ट टाकून मांडलंस त्याबद्दल आभारही झाले. आता तेच कमेन्टमधून पुढे खेचत नेण्यापेक्षा पुढे काय ते लिहिलं असतंस तर जास्तं चांगल झालं असतं तर तु आपलं तेच परत उगाळत आहेस. आता हे अगदी कमेन्टला उत्तर वगैरे हवंच कशाला होतं तुझं? वर VOLP मधे लिही त्यापेक्षा.

सर्किट तु जर ते आधीचं VOLP पोस्ट डिलिट केलं नसतंस तेव्हां तर बरं झालं असतं. त्यात मी माझं मत बारावं पोस्ट उडवून किंवा रिएडिट करुन स्टोरी पुढे न्यावी असं already लिहिलं होतं. आता तेच कशाला परत लिहू? तु त्या पोस्ट्स च्या कमेन्ट्स सकट टाक पाहू VOLP पोस्ट इथे. शुचीचं सुद्धा बाराव्या पोस्ट बद्दल तेच मत आहे. पण इतरांची इतरही पोस्ट्स बद्दल वोट्स घेऊन एकदा परत सुरुवात करुन टाकूयात.

Tulip said...

सॉरी बारावं रीएडिट आणि तेरावं डिलिट करावं असं माझं मत होतं.

सर्किट said...

OK..

magacha VOLP is put back.. plz refer to that.

i m still serious about each author "owning" his/her character. think abt it..

monologues hotil mostly, right. jevha episode madhye 'dialogs' yetil, tevha tya don authors ne basic drafts adhi e-mail ne exchange karayache, ani final post banavayacha. (just to make sure that your character is properly saying his/her dialogs according to its nature.)

dialogs post la 36 hr chi mudat devu.

this will bring lot of consistency to each character's behavior. the characters won't run around according to the whimns of different authors' moods.

what say?

Tulip said...

ओके मग त्याची सुरुवात अभिजितपासून त्याची ईषा आणि अथर्व ही पात्रे योग्य रितीने डिस्क्राईब करण्यापसून होऊदेत. मी माझ्या वरच्या दुसर्‍या कमेन्टमधे तसंच लिहिलय. त्याबद्दल त्याने त्याच्या वरच्या उत्तरात काहीच म्हटलेलं नाहीय. अभिजितला कथेच प्रोसिडिंग आवडत नव्हतं तर तो त्याचं पहिलं पोस्ट टाकून गप्प का बसला होता आत्तापर्यंत माहीत नाही. कदाचित त्याला स्वत:लाच ती पात्रे आणि मुळातलं पहिलं पात्र रमा ह्यांचा संबंध क्लिअर करायला आवडेल किंव आवडलं असतं. ते एकदा झालं की कथा सुस्पष्टपणे मांडायचा आम्हीही प्रयत्न करु. इथे नुसत्या समीक्षकी कमेन्ट्स टाकण्याने तसाही काहीच फायदा नाहीय जोपर्यंत पात्र डिफाईन होत नाहीयेत. रमाचं पात्र मी ईषा मार्फ़त व्यवस्थित डिफ़ाईन केलय(माझ्या मते). तरीही ते पुरेसं नसल्यास मी नंतर करीनच. रमाचे बाबा आणि आई वगैरे पात्र डिफ़ाईन करण्याची (अभिजितच्या 'सविस्तर' पद्धतीने) माझ्यामते फारशी गरज नाहीय. बाकी पात्रांच्या बाबतीत सर्किट तु ठरव.

पूनम छत्रे said...

itka motha discussion, tehi STY la! great! :)

ok, meehee gambhir hote. lets accept ki katha farashi sarakali nahi, jithe sarakali tithe spashT navhati.

adhi isha ani atharva cha STY madhala sthan kay ahe? te sootradhar asateel tar idea mast ahe, pan madhech te ramala disana vagaire far abstract hotay.

rama hi apali protagonist ahe. ti ek gambhir yuvati ahe jila vegala kahitari karayacha ahe he define zala ahe. farahan tichyawar prem karato ani tichya premachi apexa na karata to tichyabarobar sadaiva ahe. shama hi ek sadhi mulagi ahe, hicha farahan war prem ahe. hi zali mukhya patra. baki aai-baba, etc asoodet. adhe madhe upayogi padtat te :) hya basic goshti laxat thevoon apan goshT pudhe neooya.

circuit, pratyekani eka patrachi jababadari ghena mala paTat nahiye. basic goshti kaayam thevalya tar konalahi konabaddalahi lihayachi mubha asoo dyawee, tarach lihayala challenge milel.

i think post no. 12 thoda reedit karoon pudhe neooya. kinwa, lets say, start all over again? abhijit bathe cha post no 2 pasoon pudhe chaloo karooya? baki delete karoon paaTI koree karoon navi suruwat karooya?

what say all?

सर्किट said...

पुनम, तुमच्या सर्व सुचना मान्य! :-)

पण तस करायच असेल तर फक्त एकच अट आहे - कथा अगदी धारावाहिक होत्येय, किंवा फिल्मी होत्येय, किंवा त्या कथेस साहित्यिक मूल्य नाहीये - अशा प्रकारच्या टीकेने दबून जाउन लेखकांनी पडतं घेउ नये.

"जाउ दे मरू दे यात काही अर्थ नाही", असं फुकट्या वाचकांनी म्हटलं तर फिकीर नाही, पण इथल्या लेखकांनी असं म्हणून लिहीणं सोडू नये.

शेवटी STY म्हणजे मित्रमंडळींनी एकत्र बसून पत्ते खेळत केलेल्या दंग्यासारखा असतो - आपल्या मागच्या रांगेत बसून पत्त्यांचा खेळ फक्त बघणार्या प्रेक्षकांना मजा येतेय की नाही याची आपण पत्ते खेळताना फिकीर करत नाही. आपल्याला जोवर मजा येते तोवर आपण खेळत रहातो. ज्यांना पहायला मजा येत नाही, त्यांनी खुशाल उठून जावं.!

पूनम छत्रे said...

thanks circuit :)
mag lokancha kal paahoon kara re-editing la suruwat.. :) either episode no 2 pasun suruwat, kinwa ep. no. 12 pasun reedit..

सर्किट said...

यापुढच्या सूचना लेखकांनी VOLP च्या कॉमेण्ट्स मध्ये लिहाव्यात.

Shraddha Bhowad said...
This comment has been removed by the author.
ऋयाम said...

kahi tari lai bhari interesting ahe asa disatay.
sorry, purn wachalela nahi ajun.
wachun parat comment lihnar!
Keep it up!

btw, comment baddal dhanywad.
wel asla ki wachat raha..