Saturday, December 22, 2007

१५: वाट चालते मी....

"शमा, मेरी बात सुन यार...."

नाही, नाही... शमाला कळल होत, फरहान काय सांगणार आहे....

"सुन शमा, मैं तुम्हें शॉपिंग कॉंप्लेक्स के पास रस्तेमें छोड देता हूँ, तू शॉपिंग कर अन घरी जा टॅक्सी करून..." काही न बोलता शमाने परत एकदा सीडीप्लेअर सुरु केला, सूर गाडीतल्या वातावरणाला वेढून राहिले...

कैसा हे सफर वफाकी मंजिल का
ना है कोई हल दिलोंकी मुश्किल का
धड़कन धडकन बिखरी रंजिशे....


"मी पण येते ना फरहान, रमाने दोघांनाही बोलावलय ना? तुम्हें अकेले आने के लिये तो नहीं कहाँ ना? मैं भी आऊंगी... बस्स!!"

"शमा, समझनेकी कोशीश तो कर!! रमाने काय घोळ घातलाय तिथे, मला काही कळलेल नाही!! आता तिथे मी पोचणार, मग काय ते कळणार... कितना टाईम लगेगा, क्या पता... तुला कंटाळा येइल, तुझ शॉपिंग राहून जाईल... इकडे तुला वेळेत घरी नाही सोडल तर परत तिथून वैताग, समझती क्यों नही यार!!" फरहान वैतागला होता!! ही रमा पण ना.... कधी काही धड बोलत नाही! मनात आल की चालली करायला, कधी काही माझ्याशी शेअर करावस वाटत नाही का हिला आधी? कैसी लडकी हैं.... दिलों दिमागसे हटती भी नहीं....

कहीं तो हर लम्हा, होटोपें फरयाद हैं
किसीकी दुनिया चाहत में बरबाद हैं.....

शमाला शॉपिंग कॉंप्लेक्स्पाशी सोडून फरहानने जितक्या वेगात गाडी मारता येईल, तितक्या वेगात गाडी एअरपोर्टच्या दिशेने मारली! शमाच बाय ऐकायलाही तो थांबला नव्हता......

****

रमा शांतपणे एअरपोर्टवर फरहानची वाट बघत थांबली होती। तिला एकदम मोकळ मोकळ वाटायला लागल होत! काही तरी गुंता सुटल्यासारख! उत्तर सापडल होत, पण अजून धूसर चित्र होत डोक्यात. छोट्या छोट्या डिटेल्स सकट सगळी योजना अजून तयार नव्हती, पण जमेल ना? एकदा कामाला लागल की अंदाज येतच जाईल... तिलाच आश्चर्य वाटत होत, इतके दिवस कधी काही अस सुचलच नाही कस आपल्याला? आपण आपल एकच चाकोरीतल आयुष्य जगत राहिलो, त्याचीच नशा चढत राहिली? ईशा आणि अथर्वच प्लॅनिंग तर नव्हत ते तसल आयुष्य म्हणजे?? फटकवायलाच हव दोघांना!!हा विचार मनात येताच रमा खुदकन हसली!

आजूबाजूला गर्दी, गोंगाट, बजबजपुरी असली तरी आता रमाला शांत वाटत होत, आणि एक कसलातरी अदर्म्य उत्साह वेढायला लागला होता... डोक्यात चक्र सुरु झाली होती...

फ़िटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश....

****

पुढच्या काही मिनिटांत रमापुढे फरहान उभा होता! "तू ठीक तो हैं? क्या हुवा? फ़्लाईट कैसे मिस हो गयी? वृद्धाश्रमाच काय म्हणत होतीस? घरी माहित आहे का?? अरे कुछ तो बोल....!!" फरहानची अस्वस्थता लपत नव्हती...

रमा फरहानकडे बघून समजूतदार हसली. हा एक दोस्त असा आहे की मी कधीही हाक मारेन आणि हा दुसर्‍या क्षणाला हा हजर असेल, बिनाशर्त.... "फरहान, निघूयात की आपण. गाडीत सांगते तुला सगळ. शमा नाही आली?"

"शमा को मार गोली यार, तू चल, आधी सांग मल हे सगळ काय डोक्यात घेतलयस ते... सुन, कुछ खायेगी?"

रमा गाडीत बसली अन तिने काही सांगायला सुरुवात करायच्या आधी फरहानने विचारल, "किधर जाना हैं अब?..."

3 comments:

सर्किट said...

w..a..i..t..i..n..g.. :)

यशोधरा said...

मंडळी, हे पोस्ट फिलर वाटत असेल तर उडवायला हरकत नाही... पण गोष्ट पुढे न्यायच्या आधी या छोट्याश्या दुव्याची गरज वाटली म्हणून...

पुढे कोण लिहितय? :)

सर्किट said...

uDawaychi garaj nahi.. changala lihilayes.. pan ata problem asa zalaye ki sagale jan nusatach filler lihitayet, story kuthech jaat nahiye.

ramela zopechya golya dyavya mhanaje tichya confusion chya kachaTyatun STY ani apan suTu tari; asa mala vaTayala lagalaye. :-D