रमाने फ़रहानकडे पाहून एक गोडस हसू फेकल, अन त्याची कौतुकभरली नजर झेलत अलगद त्याच्या शेजारी येऊन बसली. फ़रहानचा तिच्यावर किती जीव आहे हे काय तिला माहीत नव्हत?? शाळेत असल्यापासून ती त्याला बघत होती. कधीच लक्षात आल होत तिच्या, पण मग थांबली होती, काहीच प्रतिक्रिया न देता आणि त्यालाही न दुखावता. पाहू, पुढे काय होतय म्हणत.....
सार्यांचच आयुष्य पुढे जात होत. शाळा, कॉलेज, कॉलेजमधली धमाल, मग रीतसर नोकरी. तिच्यासाठी तरी नोकरी हे वास्तव होत. फ़रहानच काय?? त्याला नोकरीची गरज नव्हती, घरच गडगंज होत.. पण तिला तिच जग स्वत: घडवायच होत. तिने उत्तम नोकरी मिळवली, त्यात अंगभूत हुशारीने मजलही मारलेली. सततचे परदेश प्रवास, वेगवेगळ्या क्लायंट्स बरोबर बोलणं, वावरणं, सेमिनार्स, प्रेझेंटेशन्स, मीटींग्ज, यशस्वी होत जाणारे वेगवेगळे प्रोजेक्टस....एक प्रकारची झिंग होती या सार्यात! हे सारे अनुभव दिवसगणिक आपल्याला अधिक प्रगल्भ करत जातात, अस नेहमीच वाटायच तिला. तसच आताही एकदा वाटल, आणि समाधानान ती हसली, स्वत:शीच.
"आवडली होती ना??"
"अं?? काही म्हणालास??"
" बाई साहेब, लक्ष कुठे आहे?? गाडी आवडली होती ना, अस विचारतोय!" फ़रहान विचारत होता.
थक्कच झाली ती!! हे काय? एवढा वेळ आपण स्वत:शीच संवाद साधत होतो, यात फ़रहान कुठे बसतच नाही!! आत्ता परत एकदा प्रकर्षानं हे तिला जाणवल. आणि तसही आत्तापर्यंत फ़रहानची तिच्या आयुष्यातली नेमकी जागा काय, हा एक प्रश्नच होता तिच्यासाठी. हं, आता तिला तो आवडत होता, पण म्हणून इतका? आणि असा? याच्यासाठी, वेळ पडली तर स्वत:च्या आयुष्याला थोडासा स्वल्पविराम देऊ शकू का? आणि या प्रश्नापाशी येऊन ती नेहमीच अडखळत होती.... आज परत एकदा अडखळली. स्वत:च्याच मनाचा काही थांग लागत नव्हता हे लक्षात आल्यावर जरा चिडचिडल्यागत झाली मनातल्या मनातच, पण परत एकदा छानस हसत, उत्साहाने फरहानला म्हणाली, " चलो, कुठे जायच? कुठे नेतोयस आता फिरायला?? लांब जायच भटकायला असच?? आणि मी पण चालवणार आहे गाडी!!"
Subscribe to:
Post Comments (Atom)
6 comments:
मंडळी, तुम्ही सगळेच एकदम मस्त लिहिता. मी पहिल्यांदाच अस काही लिहायचा प्रयत्न केलाय, आणि एकदम घाबरत घाबरत पोस्ट टाकलीय. कितपत जमलय माहीत नाही. अगदीच पटत नसेल, फिट होत नसेल तर बिनधास्त सांगायच, आपण उडवून टाकू!! हाय काय न नाय काय!!
आत्तापर्यंत, तुम्हां सगळ्यांच्याच पोस्टस आवडल्यात. मस्त चाललय.
जीयो! मस्त थ्रेड पिक-अप केलायेस.
म्हणजे शुची च्या घरात बसलेल्या रमेवर बाठेंनी नाराज होवून अथर्व आणि ईषा आणले, त्या दोघांना पिटाळून (पण फ़रहानला ठेवून) ट्युलिपने रमा पुढे रेटली. पण तू मात्र फ़रहानला रमा जश्शी सेल्फ़-लव्हिंग वाटली होती तशीच ठेवल्याने मला लय गारेगार वाटलं. :)
पुन्हा वर तिच्या स्वगत विचारांत फ़रहान जास्त बसत नाही ही फ़ॅक्टही अफ़लातून.
sahich challay sagaLa.. :)
nice introspection done by ramaa.
ab aage kyaa hogaa?
if farhan proposes to her again, will she say yes?
or will farhan say nothing?
will there be uncomfortable silences during the car ride? or will it be a flowing conversation that leads to something else?
chaaylaa!! loka bhaari-bhaari lihit aahet ithe :)
dha-ma-l chalalay sagal! Circuit, maja yetey gadya!
wow, its really an exciting project
i wonder whats next?
Post a Comment